महाराष्ट्र

maharashtra

Maratha Reservation Row : मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आजपासून मराठा आरक्षण संवाद दौऱ्यास सुरुवात

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 2:28 PM IST

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी 17 दिवस उपोषण केलंय. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी हे उपोषण मागं घेतलंय. आता ते आरक्षणाच्या मागणीसाठी संवाद दौऱ्यावर आहेत. आजपासून त्यांच्या या दौऱ्याची जालन्यातून सुरुवात झाली आहे.

Manoj Jarange
मनोज जरांगे

मनोज जरांगे यांचा दौरा

जालना Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून मनोज जरांगे पाटील हे संवाद दौऱ्यास अंबड इथून सुरुवात केली आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मराठा समाजाच्या एकीमुळे अंतिम निर्णयापर्यंत आलाय. त्याचा जीआर काढण्यासाठी सर्व मराठा समाजातील पुरुष व महिलांनी एकत्र यावं, यासाठी 14 ऑक्टोंबर रोजी अंतरवाली सराटी इथं मोठ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला सर्व मराठा समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.

मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून संवाद दौरा :या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी संवाद दौरा सुरू केलाय. त्या अनुषंगानं महाराष्ट्रभर गाठीभेटीचा दौरा सुरू राहणार आहे. आज 30 सप्टेंबर रोजी अंबड इथं अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन हा दौरा सुरू झाला आहे. अंबड इथून घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, परतुर, मंठा, जिंतूर आणि हिंगोली असा आजचा जरांगे पाटील यांच्या दौरा आहे. 1 ऑक्टोबर रविवार रोजी हिंगोली, कळमनुरी, यवतमाळ, नांदेड, हदगाव, अर्धापूर, तामसा असा त्यांचा दोन दिवसीय दौरा असणार आहे. (Manoj Jarange Sanvad Yatra)

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र :सरकारला मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावंच लागेल, अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलीय. त्यांनी अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेवून मराठा समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा देखील दिला होता. त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला अल्टीमेट देखील दिलाय. 30 दिवसांत कोणता निर्णय घेतला नाही, तर पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. (Manoj Jarange Patil Maharashtra Tour) अंतरवाली गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळं संपूर्ण मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation: १०० एकरवर मनोज जरांगे पाटील घेणार संवाद सभा, पहा व्हिडिओ
  2. Jalna Maratha Protest : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर मागे
  3. Maratha Reservation Issue : सरकारला मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावच लागेल - मनोज जरांगे

ABOUT THE AUTHOR

...view details