महाराष्ट्र

maharashtra

Maratha Reservation Issue : सरकारला मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावच लागेल - मनोज जरांगे

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 4:00 PM IST

Maratha Reservation Issue : मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी आज (बुधवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे (Kunbi Certificate for Maratha) पत्रकार परिषद घेत सरकारला आरक्षणाविषयी (Maratha Reservation) एक इशारा दिला आहे. मराठा समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा; पण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे सरकारला द्यावेच लागेल, असा इशारासुद्धा यावेळी जरांगे (Manoj Patil Jarange) यांनी पत्रकार परिषदेमध्ये शासनाला (Maratha Movement) दिला आहे.

Maratha Reservation Issue
मनोज पाटील जरांगे

मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करताना मनोज पाटील जरांगे

जालना Maratha Reservation Issue :यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरकार मराठा आरक्षण द्यायच्या ऐवजी नाटकं करत आहे. सरकारने ते न करता नोंदी मागण्याची अट सोडून समाजाला सरसकट आरक्षण द्यावे. नोंदी सापडल्या नाहीत तर आरक्षण देणार नाही का? असाही प्रश्न जरांगे यांनी विचारला.

शासनाला 14 तारखेपर्यंतचा वेळ दिला :या अगोदर ज्या-ज्या समाजाला आरक्षण देशभरात देण्यात आले आहे त्यामध्ये असल्या कुठल्या समाजाच्या नोंदी यापूर्वी सरकारने घेतल्या आहेत का, ते सुद्धा सरकारने स्पष्ट करावे. मराठा समाजाला कुणबी असल्याच्या नोंदी मागाव्या. तसेच आम्ही सरकारला 14 तारखेपर्यंत कुठलाच त्रास देणार नाही. 14 तारखेच्या नंतर राज्यभरात समाज आपापल्या परीने काय करायचे ते करणार आहे. कारण महाराष्ट्रातील मराठ्यांना सरकारला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावचं लागणार आहे. सरकारने मराठा समाजाकडून 40 दिवसांचा वेळ हा स्वतःहून मागून घेतलेला आहे. हा वेळ आम्ही सरकारला दिलेला नाही तर सरकारने आमच्याकडून घेतला आहे. त्यामुळे सरकारने योग्य तो निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, तसंच मराठा प्रवर्गाला 50 टक्क्यांच्या आत जर सरकार आरक्षण देत असेल तर ते आम्ही घ्यायला तयार आहोत. पण 50% च्या वरती मराठा प्रवर्ग तयार करून जर आरक्षण देत असेल तेथे खोटं आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही, असा इशारा सुद्धा यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

मराठ्यांच्या भावना समजून घ्याव्या :मनोज जरांगे पाटील यांनी कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देताना सांगितले आहे की, 14 तारखेला आम्ही सुद्धा कडाडून सांगणार आहोत की मराठा काय आहे. कारण कायदा हा मराठ्यांच्या सुद्धा बाजूला आहे. मराठ्यांच्या भावना सरकारला समजून घ्याव्याच लागतील. त्याकरता वडेट्टीवार यांनी यानंतर बोलताना थोडा विचार विनिमय करून बोलायला पाहिजे. कारण मराठा समाज हा प्रत्येक पक्षाच्या पाठीशी राहिला आहे व प्रत्येक पक्षाला मराठा समाजाने मोठे केलेले आहे. 75 वर्षांत मराठ्यांनी सर्वांना मोठे केले आहे. त्यांनी आता आमचे उपकार फेडण्याची वेळ आली आहे. त्याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येऊन योग्य तो विचार करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली.

हेही वाचा:

  1. NCP President Row : राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण? अजित पवार म्हणाले, निवडणूक आयोगानं...
  2. Muslim Reservation : ...तर आमच्याकडंही 'जरांगे पाटील' आहेत; मुस्लिम आरक्षणावरून 'एमआयएम'आक्रमक
  3. Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंच्या उपोषणात लाठीचार्जपासून मुख्यमंत्र्यांची भेट, वाचा १७ दिवसात झालं तरी काय....

ABOUT THE AUTHOR

...view details