महाराष्ट्र

maharashtra

Jalna Students Return From Ukraine : जालन्यातील तीन विद्यार्थी मायदेशी परतले

By

Published : Feb 28, 2022, 11:47 AM IST

जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील पाच विद्यार्थी युक्रेन येथे अडकले ( Jalna Students Return From Ukraine ) होते. त्यामुळे त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात चिंतेत होते. नागेश साळवे हा सुरुवातीला घरी आला होता. त्यामळे सर्वांना त्याने तेथील परिस्थिती सांगितली आणि धीर दिला होता. तरीही युद्ध परिस्थिती असल्यामुळे येथील दुसऱ्या पालकांच्या मनात भितीचे वातावरण होते. मात्र रविवारी जालन्यातील सर्वच विद्यार्थी हे युक्रेनमधुन परत आल्याने ( Jalna students return from Ukraine ) सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Jalna Students Return From Ukraine
जालन्यातील तीन विद्यार्थी मायदेशी परतले

जालना - जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील पाच विद्यार्थी युक्रेन येथे अडकले ( Jalna Students Return From Ukraine ) होते. त्यामुळे त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात चिंतेत होते. नागेश साळवे हा सुरुवातीला घरी आला होता. त्यामळे सर्वांना त्याने तेथील परिस्थिती सांगितली आणि धीर दिला होता. तरीही युद्ध परिस्थिती असल्यामुळे येथील दुसऱ्या पालकांच्या मनात भितीचे वातावरण होते. मात्र रविवारी जालन्यातील सर्वच विद्यार्थी हे युक्रेनमधुन परत आल्याने ( Jalna students return from Ukraine ) सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

जालन्यातील तीन विद्यार्थी मायदेशी परतले

विद्यार्थी परतल्याने आनंद -

जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील पाच विद्यार्थी हे युक्रेन येथे शिकायला होते. त्यातील राहिलेले तीन विद्यार्थीही सुयोग धनवाई, संकेत उखार्डे, व तेजस पंडित हे परत आले आहेत. त्यांनी युक्रेनमधील उझिरोड विद्यापीठातून हांगेरीकडून प्रयाण केले होते. तेथून ते भारतीय विमानाने रविवारी सकाळी विमानाने दिल्ली येथे पोहचले. संध्याकाळी 8 वाजता औरंगाबाद येथील विमानताळावर पोहचून पालकांना भेटले. त्यांचे पालकांनी स्वागत केले. त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांचे पालकांनी सांगितले कि, मुले त्या ठिकाणी सुखरूप होते तरी युद्धाच्या भीतीने घाबरले होतोत व मुलांचा परिस्तिथी पाहून सर्वच लोकांनी आमच्याशी, मुलांशी संपर्क केला व आमच्या मुलांना धीर दिला. याबद्दल पालकांनी सर्व मित्र परिवाराचे व गावकर यांचे आभार मानले.

हेही वाचा -Jalgaon youth stranded in Kiev : युक्रेनमधील किव्ह शहरात अडकला जळगावचा तरूण;सरकारकडे मदतीची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details