महाराष्ट्र

maharashtra

लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल, एक जण ताब्यात

By

Published : May 22, 2021, 8:12 PM IST

लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.

Jalna police have arrested an accused in  case of making child Physical abuse videos viral
लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल, एक जण ताब्यात

जालना - लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या एका आरोपीला सायबर विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव प्रदीप सुंदरलाल भालेराव असे आहे.

आरोपीला घेतले ताब्यात -

लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर आणि फेसबुक वर व्हायरल केल्याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाला गती आली आणि या विभागाचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या टीमने या तपासाला सुरुवात केली. तपास करत असताना हा गुन्हा जुन्या जालन्यातील नूतन वसाहत भागात असलेल्या प्रयाग नगर मधील प्रदीप सुंदरलाल भालेराव या तरुणाने केला असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तरुण काही पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सापळा लावून 22 मे रोजी या आरोपीला पकडले आहे.

यांनी केली कारवाई -

तपासासाठी अंबादास साबळे, सतीश गोफने, लक्ष्मीकांत अडेप, शेखर दुर्गम, संगीता चव्हाण, सीमा चौधरी, अर्चना अंधे, यांनी प्रयत्न केले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्ह्यांमध्ये वापरलेला मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details