महाराष्ट्र

maharashtra

Jalna News: नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात, मोती तलावातील मृत मासे फेकले उघड्यावर

By

Published : Mar 5, 2023, 1:42 PM IST

शनिवारी जालना शहरातील मोती तलावात लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले आहे. जालना नगरपरिषद शहरातील नागरिकांच्या जीवावर उठली असल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेने मोती तलावातील मृत मासे डंपिंग ग्राऊंडवर व उड्डाणपूल खाली आणून फेकले.

Jalna News
मोती तलावात लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले

मोती तलावात लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले

जालना :मोती तलावातील हे मासे एखाद्या संसर्गजन्य आजाराने मेले असावे, असा अंदाज पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच मृत माशांचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथिल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही हे मासे नक्की कशामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मेले याची अजूनही खातरजमा झालेली नाही. शिवाय रिपोर्ट देखील आलेला नाही. दरम्यान तलावात मोठ्या प्रमाणात मेलेले मासे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी डंम्पिंग ग्राउंडवर आणून फेकले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

उघड्यावर हे मासे आणून टाकले : विशेष म्हणजे नगर परिषदेचे कर्मचारी हे मेलेले मासे जेसीबीच्या सहाय्याने एखादा खड्डा करून या खड्ड्यात हे मासे पुरून टाकून त्यांची विल्हेवाट लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र नगर परिषद कर्मचाऱ्यांनी थेट डंम्पिंग ग्राउंडवर उघड्यावर हे मासे आणून टाकली. त्यामुळे 5 किलोमीटरपर्यंत या माशांची दुर्गंधी पसरली आहे. आता या प्रकारामुळे नगरपरिषद सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या समस्येकडे कुणीतरी लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे.


मच्छि उत्पादकात एकच खळबळ :जालना शहरातील मोती तलावात हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. या तलावात हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज तलावाच्या काठाजवळ तसेच पाण्यावर तरंगताना हे मृत्युमुखी पडलेले मासे आढळून आले. तर काही ठिकाणी मृत माशांचा अक्षरशः खच पडलेला दिसून आला. त्यामुळे पशुधन विभागाच्या एका पथकाने मेलेल्या माशांचे नमुने तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी या माशांची तपासणी करत विच्छेदन केले. त्यांना प्रथमदर्शनी या माशांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शिवाय मृत माशांचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : Opposition Leaders Letter To PM : 'तुमची लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे वाटचाल', सिसोदिया यांच्या अटकेवरून विरोधी नेत्यांचे मोदींना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details