महाराष्ट्र

maharashtra

खोतकरांनी सांगितले नाही त्यामुळे ते शिंदे गटात गेल्याचे म्हणता येणार नाही - भास्कर आंबेकर

By

Published : Jul 25, 2022, 4:39 PM IST

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा आहे. यावर आता जालना जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खोतकर यांनी वैयक्तिक कामानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, अशी प्रतिक्रिया जालन्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली.

Bhaskar Ambekar comment on Arjun Khotkar
अर्जुन खोतकर शिंदे गट प्रवेश चर्चा

जालना -अर्जुन खोतकर यांनी वैयक्तिक कामानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून त्यांची शिवसेनेवर प्रचंड निष्ठा आहे. त्यामुळे, खोतकर यांनी शिवसेनेतच राहावे, त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत, अशी प्रतिक्रिया जालन्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली. खोतकर यांनी पाठिंबा दिल्याचा दावा शिंदे गटाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला असला तरी जोपर्यंत स्वतःहून खोतकर शिवसेनेचा त्याग केला, असे म्हणत नाही, तोपर्यंत त्यांनी शिवसेना सोडली, असे म्हणता येणार नाही, असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे भास्कर आंबेकर

हेही वाचा -Police Firing : जालन्यात दोन गटात राडा, पोलिसाचा हवेत गोळीबार; हाणामारीत तीन जण गंभीर जखमी

शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा - शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर ( Former Minister Arjun Khotkar ) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या बातमीमुळे जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शिवसेनेला जबर धक्का पोहचला आहे. निष्ठावंत असल्याने खोतकर यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केले होते. मात्र, आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खोतकर यांनी जाहीर प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

भेटीदरम्यान रावसाहेब दानवेंनी केले स्वागत? - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांना पेढा भरवून त्यांचे शिंदे गटात स्वागत केल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच खोतकर यांनी आपण ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असून शिंदे गटात कधीही जाणार नाही, असा दावा केला होता. मात्र, आज शिंदे गटात खोतकर यांनी प्रवेश केल्यास हा जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का मानला जाणार आहे.

अर्जुन खोतकर यांच्यावर नुकतीच ईडीची कारवाई - अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडीने फास कसला असून, कारखान्याची मालमत्ता, जमीन, यंत्रसामग्री सील केली आहे. त्यामुळेच, खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. मात्र, खोतकर हे शिंदे गटात सामील झाले आहेत की नाही याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत शिंदे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जाते.

हेही वाचा -Former Minister Arjun Khotkar : जालनामध्ये शिवसेनेला भगदाड; अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश?

ABOUT THE AUTHOR

...view details