महाराष्ट्र

maharashtra

Gram Panchayat Election : १६ सरपंच बिनविरोध; केंद्रीय मंत्री दानवेंच्या जन्मगावात 30 वर्षांनंतर निवडणूक

By

Published : Dec 17, 2022, 10:38 PM IST

जालना जिल्ह्यातील होत असलेल्या 266 पैकी 16 ग्रामपंचायतचे सरपंच आणि 333 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. गेल्या 30 वर्षापासून केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे ( Union Minister Raosaheb Danve ) यांचे जन्मगाव असलेले जवखेडा खुर्द गावातील ग्रामपंचायतीची देखील यावर्षी निवडणूक ( Gram Panchayat Election ) होणार आहे. येत्या रविवारी, 18 डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Gram Panchayat Election
ग्रामपंचायत निवडणूक

जालन्यात ग्रामपंचायत निवडणूकीत १६ सरपंच बिनविरोध

जालना : राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची ( Gram Panchayat Election ) रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे भोकरदन तालुक्यातील जन्मगाव असलेले जवखेडा खुर्द गावची ग्रामपंचायत गेल्या 30 वर्षापासून बिनविरोध होत आहे. परंतु यावर्षी या ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. याच ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे ( Union Minister Raosaheb Danve ) यांची राजकीय कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील होत असलेल्या 266 पैकी 16 ग्रामपंचायतचे सरपंच आणि 333 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

जालन्यात 16 सरपंच बिनविरोध : जालना जिल्ह्यातील होत असलेल्या 266 पैकी 16 ग्रामपंचायतचे सरपंच आणि 333 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यातील सातही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात मतदान होणार आहे अंबड तालुक्यामध्ये ४० गावात ११६ सरपंच पद आणि ७३६ सदस्यांची निवड होणार आहे. येत्या रविवारी 18 डिसेंबरला ग्रामपंचायत साठी मतदान होणार आहे

या तालुक्यांत निवडणूक :घनसावंगी तालुक्यात ३४ गावात १०९सरपंच पद आणि ६५५ सदस्यांची निवड होणार आहे. जाफराबाद तालुक्यातील ५५ गावांमध्ये १४५ सरपंच व ७६४ सदस्य पदासाठी जालना तालुका २९ गावांसाठी ८९ सरपंच आणि ५११ सदस्य पदासाठी चुरस होणार आहे तर परतुर तालुक्यामध्ये ४१ गावात ११९ सरपंच पद आणि ७६५ सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. भोकरदन तालुक्यामध्ये ३२ गावात ७८ सरपंच आणि ४५५ सदस्यांची निवड होणार आहे. मंठा तालुक्यात ३५ गावात ९४ सरपंच पद आणि ४३५ सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. एकूण २६६ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ७४९आणि सदस्य पदासाठी ४३२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

या गावांत बिनविरोध : बिनविरोध सरपंच निवड झालेली गावे भोकरदन मध्ये भिवपूर ग्रामपंचायत संजय जाधव सरपंच पदी मानापुर ग्रामपंचायतचे लक्ष्मण सुरडकर गोकुळ गावाचे सविता दाभाडे खामखेडा गावचे सविता नागवे हे बिनविरोध सरपंच झाले आहे. तर जाफराबाद बुटखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच द्वारकाबाई पवार नळविहरा ग्रामपंचायत प्रीती जंजाळ खानापुर वरखेडा पंचायत फिरंगी, शेषराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे तर परतुर मध्ये पाडळी पंचायत प्रसाद काकडे सरपंच शेवगा ग्रामपंचायतआशा धुमाळ बामणी ग्रामपंचायत कविता आवटे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. मंठामध्ये गुळखंड पंचायत विष्णू आडे आधवाडी ग्रामपंचायत नागाबाई कांबळे कोकरंबा पंचायत मंदोदरी इक्कर रानमाळ ग्रामपंचायत दत्तात्रय कांगणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली तर अंबड मध्ये वाघलखेडा ग्रामपंचायत परमेश्वर शेळके यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. घनसावंगी मध्ये गाडेसावरगाव ग्रामपंचायत गणेश खोतकर यांची पंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details