महाराष्ट्र

maharashtra

Jalna News : मॅडम, मला शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या, शेतकऱ्याच्या मागणीमुळे तहसिलदार चक्रावले

By

Published : Jul 7, 2023, 7:56 PM IST

Updated : Jul 7, 2023, 9:35 PM IST

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या, अशी मागणी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने तहसिलदारांकडे केली आहे. मॅडम मला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे मला शेतात जाण्यासाठी रस्ता द्यावा, अन्यथा हेलिकाॅप्टर द्या अशी मागणी देऊळझरी येथील शेतकरी सुनील भोपळे यांनी जाफ्राबाद तहसfलदारांना केली आहे.

Jalna News
Jalna News

शेतकरी सुनील भोपळे यांची प्रतिक्रिया

जालना :तहसिलदार मॅडम, मला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. माझ्या शेताच्या आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाही. त्यामुळे मला माझी जमीन कसता येत नाही. या जमिनीत पेरणी करता येत नाही. ही जमीन पडीक राहण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे माझी जमीन मला कसता यावी, म्हणून माझ्या शेतात जाण्यासाठी मला रस्ता उपलब्ध करून द्या, किंवा रस्ता देता येत नसेल तर हेलिकॉप्टर घेऊन द्या" अशी लेखी मागणी जालन्यातील एका शेतकऱ्याने जाफ्राबादच्या तहसीलदारांकडे केली आहे. आज तहसिलदार, उपविभागीय कार्यालयात गेल्या असल्याने संबंधित शेतकऱ्याला सुनावणीची पुढची तारीख मिळाली नाही. लवकरच या शेतकऱ्याची सुनवणी होणार आहे. शेतकऱ्याच्या मागणीवर तहसिलदार काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंत्रणा लागली कामाला : शेतकऱ्याच्या या मागणीमुळे संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे. सुनील भोपळे या शेतकऱ्याने केलेल्या मागणीमुळे तहसिलदार देखील चक्रावून गेल्या आहेत. तसेच शेतकऱ्याने त्याचे निवेदन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दिल्याने यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देलेल्या आदेशामुळे तलाठी, मंडळाधिकारी यांनी तात्काळ पंचनामा करत अहवाल तहसिलदारांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय होवू शकला नाही.

हेलिकॉप्टर घेऊन न दिल्यास आत्महत्येचा इशारा : सुनील भोपळे असे हेलिकॉप्टरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुनील हा जाफ्राबाद तालुक्यातील देऊळझरी येथील रहिवासी असून शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने हतबल झाला आहे. सुनीलची जाफ्राबाद तालुक्यातील देऊळझरी शिवारातील गट नंबर 350 मध्ये जमीन आहे. पण याच गटातील आजूबाजूचे शेतकरी त्यांना शेती मशागतीसाठी जाऊ देत नाही. रस्ता देखील देत नाही. त्यामुळे वैतागलेल्या या शेतकऱ्याने अखेर तहसीलदारांना गाठून हेलिकॉप्टरची लेखी मागणी केली आहे. या मागणीनंतर तहसीलदारांनी तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना पाठवून पंचनामा केला आहे.

कृषी मंत्र्यांनी दिले आदेश : यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, रस्ता किंवा हेलिकॉप्टर न घेऊन दिल्यास मंत्रालयासमोर जाऊन कधीही आत्महत्या करीन असा इशारा सुनीलने तहसीलदारांना दिला आहे. विशेष म्हणजे त्याने राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची देखील भेट घेऊन हीच मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन हातात पडताच सत्तार यांनी तहसिलदारांना तातडीने हे प्रकरण मिटवून सुनीलला रस्ता उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहे.

Last Updated : Jul 7, 2023, 9:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details