महाराष्ट्र

maharashtra

जालन्यात परतीच्या पावसाचे थैमान; मका, कापूस पिकांचे नुकसान

By

Published : Oct 26, 2019, 1:32 PM IST

शेतकऱ्याने पिकांची काढणी देखील केली. मात्र, परतीच्या पावसाने थैमान घातले आहेत. त्यामुळे मक्याचे कणसे पाण्यावर तरंगत आहेत, तर कापसाची बोंडे तुटले आहेत. त्यामुळे आता जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

जालन्यात परतीच्या पावसाचे थैमान

जालना - जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या १० दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे काढणी झालेले मक्याचे कणसे पाण्यावर तरंगू लागले आहेत. ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

जालन्यात परतीच्या पावसाचे थैमान

शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, पाऊस वेळेवर पडला नाही. त्यानंतर थोडाफार पाऊस आला. त्यानंतर मात्र पावसाने दांडी मारली. त्यामुळे आता पिके येणार की नाही? अशी चिंता शेतकऱ्याला लागली होती. मात्र, १५ दिवसानंतर पुन्हा पाऊस आला आणि मक्याचे चांगले पिक आले. कणसे देखील भरली. शेतकऱ्याने पिकाची काढणी देखील केली. मात्र, परतीच्या पावसाने थैमान घातले आहेत. त्यामुळे मक्याचे कणसे पाण्यावर तरंगत आहेत, तर कापसाची बोंडे तुटले आहेत. त्यामुळे आता जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

Intro:गेल्या दहा दिवसांपासून परतीच्या पावसाचे थैमान..मकांचे कणसे तरंगत आहे साचलेल्या पाण्यावर...
शेतकऱ्यांना च्या डोळ्यात पाणी;शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी कोण पुसणार
भोकरदन:भोकरदन तालुक्यात गेल्या दहा दिवसा पासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजावर मोठे आर्थिक संकट ओढवल्याने शेतकरी राजाच्या डोळयांत अश्रू आले आहेत ते कोण पुसणार अशी विनवणी शेतकऱ्यांमधून होत आहे...
शेतकऱ्यांनी सोंगणी करून ठेवलेल्या मकांचे कणसे साचलेल्या पाण्यावर तरंगत असून शेतकरी जमा करण्यासाठी पाण्यात जावून जमा करीत आहे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हेरवून घेतल्याचे विदरक दृश्य तालुक्यात ठिक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे...
शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून,कर्ज काढून, उधारी पैसे घेऊन बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली पंरतु पाऊस वेळेवर आला नाही..नंतर कसाबसा पाऊस आला त्यावर पीके रानावनात जोमात येऊन डोली लागली.पुन्हा 15 दिवसांनी पावसाने उघडीप दिली शेतकरी राजा चिंतेत पडला पाऊस पडतो का नाही.. परंतु पाऊस पडला कशी बशी पेरली पिके जोमात येऊन कणसे भरले नंतर बाजरी,मका,सोयाबीन पिके सोंगणीला आली त्या पिकांची शेतकऱ्यांनी सोंगणी सुरू केली त्यावेळा पासून गेल्या दहा दिवसां पासुन परतीच्या सतत मूळसधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसत आहे या पावसामुळे सोंगणी केलेल्या शेतीमध्ये पाणी साचले आहे आणि मका पिकांचे कणसे पाण्यावर तरंगले असून कपाशी पिकां बोंडे फुटले आहे त्यामधील बियांना व मकांच्या कणसाला कोंब फुटले आहेत असे विदारक चित्र पाहवयास मिळत आहे...भोकरदन तालुक्यत शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी लागलेला पैसा चा मोबदला ही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे या कसे शासनाने तात्काळ लक्ष देऊन पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्या कडून होत आहे..कमलकिशोर जोगदंडे,etv bharat भोकरदनBody:गेल्या दहा दिवसांपासून परतीच्या पावसाचे थैमान..मकांचे कणसे तरंगत आहे साचलेल्या पाण्यावर...
शेतकऱ्यांना च्या डोळ्यात पाणी;शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी कोण पुसणार
भोकरदन:भोकरदन तालुक्यात गेल्या दहा दिवसा पासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजावर मोठे आर्थिक संकट ओढवल्याने शेतकरी राजाच्या डोळयांत अश्रू आले आहेत ते कोण पुसणार अशी विनवणी शेतकऱ्यांमधून होत आहे...
शेतकऱ्यांनी सोंगणी करून ठेवलेल्या मकांचे कणसे साचलेल्या पाण्यावर तरंगत असून शेतकरी जमा करण्यासाठी पाण्यात जावून जमा करीत आहे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हेरवून घेतल्याचे विदरक दृश्य तालुक्यात ठिक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे...
शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून,कर्ज काढून, उधारी पैसे घेऊन बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली पंरतु पाऊस वेळेवर आला नाही..नंतर कसाबसा पाऊस आला त्यावर पीके रानावनात जोमात येऊन डोली लागली.पुन्हा 15 दिवसांनी पावसाने उघडीप दिली शेतकरी राजा चिंतेत पडला पाऊस पडतो का नाही.. परंतु पाऊस पडला कशी बशी पेरली पिके जोमात येऊन कणसे भरले नंतर बाजरी,मका,सोयाबीन पिके सोंगणीला आली त्या पिकांची शेतकऱ्यांनी सोंगणी सुरू केली त्यावेळा पासून गेल्या दहा दिवसां पासुन परतीच्या सतत मूळसधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसत आहे या पावसामुळे सोंगणी केलेल्या शेतीमध्ये पाणी साचले आहे आणि मका पिकांचे कणसे पाण्यावर तरंगले असून कपाशी पिकां बोंडे फुटले आहे त्यामधील बियांना व मकांच्या कणसाला कोंब फुटले आहेत असे विदारक चित्र पाहवयास मिळत आहे...भोकरदन तालुक्यत शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी लागलेला पैसा चा मोबदला ही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे या कसे शासनाने तात्काळ लक्ष देऊन पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्या कडून होत आहे..कमलकिशोर जोगदंडे,etv bharat भोकरदनConclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details