महाराष्ट्र

maharashtra

शेतकरी आत्महत्या प्रकरणी बँक व्यवस्थापकावर अखेर गुन्हा दाखल

By

Published : Mar 7, 2021, 7:17 AM IST

शेतकरी देविदास मात्रे यांच्याकडे सात एकर शेत जमीन होती. त्यांच्यावर शेलगाव येथील ग्रामीण बँकेच्या शाखेचे पीक व गृह कर्जाची व्याजासाहित रक्कम 14 लाख रुपये झाली होती. शिवाय त्यांनी खासगी सावकाराकडून देखील कर्ज घेतले होते, त्याचाही तगादा सुरूच होता. त्यात मागील तीन वर्षांपासून शेतीत काहीच घडले नसल्यामुळे कर्जाची परतफेड करण्याची त्यांना विवंचना सतावत होती.

farmer suicide case
बँक व्यवस्थापकावर अखेर गुन्हा दाखल

बदनापूर (जालना)- बदनापूर तालुक्यातील हलदोला येथील शेतकरी देविदास विठ्ठलराव मात्रे यांनी 4 मार्चला पहाटे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिट्ठीत शेलगाव (ता. बदनापूर) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच शेतकरी देविदास मात्रे यांनी आत्महत्या केली असून शाखाधिकारी एस. पी. पटेल विरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत आमदार नारायण कुचे हलदोला ग्रामस्थांनी केली होती.

आमदार कुचे यांच्या नेतृत्वात ठिय्या-

या मागणीसाठी शनिवारी (ता. सहा) बदनापूर पोलीस ठाण्यासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन देखील केले. शेवटी शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी पटेल यांच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ज फेडीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या-

हलदोला येथील शेतकरी देविदास मात्रे यांच्याकडे सात एकर शेत जमीन होती. त्यांच्यावर शेलगाव येथील ग्रामीण बँकेच्या शाखेचे पीक व गृह कर्जाची व्याजासाहित रक्कम 14 लाख रुपये झाली होती. शिवाय त्यांनी खासगी सावकाराकडून देखील कर्ज घेतले होते, त्याचाही तगादा सुरूच होता. त्यात मागील तीन वर्षांपासून शेतीत काहीच घडले नसल्यामुळे कर्जाची परतफेड करण्याची त्यांना विवंचना सतावत होती. त्यात त्यांच्याकडे कर्जवसुलीसाठी बँकेचा तगादा सुरूच होता. एकूणच अस्वस्थ होत त्यांनी 4 मार्चच्या पहाटे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्यपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत बँक व्यवस्थापकांचे नाव-

मात्रे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 26 फेब्रुवारीला एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात शेलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी कर्जाची परतफेड कर म्हणून तगादा लावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या तगाद्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

आमदार कुचे यांच्या नेतृत्वात ठिय्या-

शेतकरी देविदास मात्रे यांच्या आत्महत्येला महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी पटेल जबाबदार आहेत, असा आरोप करीत आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हलदोला येथील ग्रामस्थांनी शनिवारी (ता. सहा) बदनापूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. शेवटी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांची साप्ताहिक रजा असताना त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली.

अखेर गुन्हा दाखल-

आत्महत्याग्रस्त शेतकरी देविदास मात्रे यांचे पुत्र पांडुरंग मात्रे यांच्या तक्रारीवरून शेलगाव येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखाधिकारी संशयित एस. पी. पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार नित्यानंद उबाळे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details