महाराष्ट्र

maharashtra

AAP Jalna राजकीय नेत्यांकडून जालन्यातील स्टील उद्योजकांना पार्टनरशिपची मागणी, आम आदमी पक्षाचा आरोप

By

Published : Sep 12, 2022, 9:52 PM IST

AAP CRITICIZES POLITICAL LEADERS IN JALNA

महाराष्ट्रातील स्टील हब (steel hub jalna) म्हणून जालन्याकडे पाहिलं जातं. काही दिवसांपूर्वी येथील आयकर विभागानं इथल्या स्टील उद्योगांवर धाडी (IT department raided steel industries) टाकल्या होत्या. आता, आम आदमी पार्टीचे (AAP) धनंजय शिंदे (dhananjay shinde) यांनी पत्रकार परिषद घेत, जालन्यात राजकीय नेत्यांकडून स्टील उद्योजकांना पार्टनरशिपची मागणी केली जातं असल्याचा आरोप केला आहे.

जालनामहाराष्ट्रातील स्टील हब (steel hub jalna) म्हणून जालन्याकडे पाहिलं जातं. काही दिवसांपूर्वी येथील आयकर विभागानं इथल्या स्टील उद्योगांवर धाडी (IT department raided steel industries) टाकल्या होत्या. आता, आम आदमी पार्टीचे (AAP) धनंजय शिंदे (dhananjay shinde) यांनी पत्रकार परिषद घेत, जालन्यात राजकीय नेत्यांकडून स्टील उद्योजकांना पार्टनरशिपची मागणी केली जातं असल्याचा आरोप केला आहे.

आम आदमी पार्टी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जालना जिल्ह्यात ताकदीनं लढणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज जालन्यात आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले.

काही दिवसांपूर्वी जालना शहरातील स्टील कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर काही राजकिय नेते जालन्यात स्टील उद्योजकांवर दबाव (Political leaders demand partnership with steel entrepreneurs in Jalna) आणत असून स्टील उद्योगांमध्ये पार्टनरशिप मागत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. या उद्योजकांशी आम्ही चर्चा करणार असून येथील वातावरण भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच देखील शिंदे यांनी म्हटलं आहे. या उद्योजकांना वाचवणं आणि संरक्षण देणं हे सरकारचं काम आहे मात्र सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचं देखील शिंदे यांनी म्हटलं आहे.

जालन्यात राजकीय नेत्यांकडून स्टील उद्योजकांना पार्टनरशिपची मागणी -आम आदमी पार्टी

काय आहे प्रकरणऑगस्ट महिन्यातजालन्यातील औद्योगिक वसाहतीत जीएसटी विभागाच्या पथकाने GST Raid on 5 Steel Companies धाडी टाकल्या. पाच स्टील कंपन्यांवर जीएसटीच्या पथकाने या धाडी टाकल्याची माहिती समोर आली होती. अंदाजे 40 गाड्यांचा ताफा औद्योगिक वसाहतीत दाखल 40 cars entered the industrial estate झाला होता. यातील अधिकारी एकाच वेळी तीन स्टील कंपन्यांमध्ये Three steel companies GST Raid गेले. धाडी दरम्यान जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत कंपन्यांमध्ये झाडाझडती घेतली.

कारखानदारांच्या कार्यालयावर झाली होती धाड : स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर कार्यालयावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली होती. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागले होते. १ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले २६० अधिकारी, कर्मचारी १२० वाहनांतून जालन्यात पोहोचले होते. कारवाईत सापडलेली ५८ कोटींची रोकड ३५ कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली, तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या. या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश होता.

ABOUT THE AUTHOR

...view details