महाराष्ट्र

maharashtra

पावसाने ओढ दिल्याने हतनूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबवला

By

Published : Jul 14, 2019, 10:00 AM IST

तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ७ ते ८ दिवसांपासून पाऊस थांबला आहे. या कारणामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक बंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणातून २३ जूनपासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

धरणाचे दृष्य

जळगाव- गेल्या आठवड्याभरापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. याशिवाय विदर्भ आणि मध्यप्रदेशात देखील तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे.

धरणाचे दृष्य

तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ७ ते ८ दिवसांपासून पाऊस थांबला आहे. या कारणामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक बंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणातून २३ जूनपासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. विसर्गानंतर धरणाची जलपातळी २०९.५०० मीटरवर स्थिर ठेवण्यात आली आहे. पाऊस पुन्हा सुरू झाल्यानंतर धरणात पाण्याची आवक वाढली की धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

यावर्षी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २० जूनपासून चांगला पाऊस झाला होता. धरणात पाण्याची आवक वाढल्याने २३ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. यामुळे धरणाचे १२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येऊन त्यातून २७ हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला होता. पाऊस थांबल्याने आता हे १२ दरवाजे बंद करण्यात आले आहेत. विसर्गानंतर धरणाची जलपातळी २०९.५०० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे.

Intro:जळगाव
गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. याशिवाय विदर्भ आणि मध्यप्रदेशात देखील तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यात तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणातून होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे.Body:तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 7 ते 8 दिवसांपासून पाऊस थांबला आहे. या कारणामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक बंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणातून 23 जूनपासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. विसर्गानंतर धरणाची जलपातळी 209.500 मीटरवर स्थिर ठेवण्यात आली आहे. पाऊस पुन्हा सुरू झाल्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली की धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.Conclusion:यावर्षी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 20 जूनपासून चांगला पाऊस सुरू झाला होता. धरणात पाण्याची आवक वाढल्याने 23 जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. धरणाचे 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येऊन त्यातून २७ हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला होता. पाऊस थांबल्याने आता हे 12 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. विसर्गानंतर धरणाची जलपातळी 209.500 मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details