महाराष्ट्र

maharashtra

जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस; हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

By

Published : Jul 28, 2019, 10:35 PM IST

जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाचे आगमन झाले. शनिवारी आणि रविवारी दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील लघू, मध्यम तसेच मोठ्या प्रकल्पांमध्ये काही अंशी जलसाठा वाढला आहे.

जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस

जळगाव - जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. बहुप्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. शेतातील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बहुप्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली
जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाचे आगमन झाले. शनिवारी आणि रविवारी दिवसभर पाऊस सुरू राहिला. गेल्या दोन दिवसांत जळगाव, भुसावळ, जामनेर, चोपडा, अमळनेर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरण १०० टक्के भरले आहे. तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे रविवारी दुपारनंतर भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. सध्या शेतांमध्ये वाफसा नसल्याने पिकांना खतांची मात्रा देण्याची कामे सुरू आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील लघू, मध्यम तसेच मोठ्या प्रकल्पांमध्ये काही अंशी जलसाठा वाढला आहे. नद्या, नाल्यांना पाणी आल्याने विहिरींचा पाणीसाठा वाढला आहे.

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडले-

जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यात तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. या ३६ दरवाज्यांतून ९३६.०० क्यूसेक प्रतिसेकंद इतक्या वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तोंडापूर धरण १०० टक्के भरले-

जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे खडकी नदीवर असलेले तोंडापूर धरण १०० टक्के भरले आहे. गेल्या २४ तासांत तोंडापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली. रविवारी सकाळी हे धरण १०० टक्के भरले. गेल्या वर्षी २८ जुलै रोजी धरणात शून्य टक्के साठा होता. मात्र यंदा हे धरण २८ जुलैलाच १०० टक्के भरले आहे. हे धरण भरल्यामुळे आता तोंडापूर परिसरातील शेकडो गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. त्याचप्रमाणे हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

Intro:जळगाव
जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. बहुप्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.Body:जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी शुक्रवारी रात्रीपासून पावसाचे आगमन झाले. शनिवारी दिवसभर पाऊस सुरू होता. त्यानंतर रविवारी देखील दिवसभर पाऊस सुरू होता. गेल्या २ दिवसात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा जळगाव, भुसावळ, जामनेर, चोपडा, अमळनेर या तालुक्यांमध्ये झाला आहे. या पावसामुळे जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरण १०० टक्के भरले आहे. तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे रविवारी दुपारनंतर भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. या पावसामुळे पिके तरारली आहेत. जोरदार बरसलेल्या पावसामुळे शेतांमध्ये वाफसा नसल्याने पिकांना खतांची मात्रा देण्याची कामे सुरू आहेत. दरम्यान, या पावसामुळे जिल्ह्यातील लघू, मध्यम तसेच मोठ्या प्रकल्पांमध्ये काहीअंशी जलसाठा वाढला आहे. दुसरीकडे, नद्या, नाल्यांना देखील पाणी आल्याने विहिरी देखील जिवंत झाल्या आहेत.

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडले-

जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशात जोरदार पाऊस पडत असल्याने भुसावळ तालुक्यात तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. या ३६ दरवाज्यातून ९३६.०० क्यूसेक प्रतिसेकंद इतक्या वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तोंडापूर धरण १०० टक्के भरले-

जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे खडकी नदीवर असलेले तोंडापूर धरण १०० टक्के भरले आहे. गेल्या २४ तासात तोंडापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली. २८ रोजी सकाळी हे धरण १०० टक्के भरले. धरणातून पाणी ओसंडून वाहत आहे. गेल्या वर्षी २८ जुलै रोजी धरणात शून्य टक्के साठा होता. मात्र यंदा हे धरण २८ जुलैलाच १०० टक्के भरले आहे. हे धरण भरल्यामुळे आता तोंडापूर परिसरातील शेकडो गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. त्याचप्रमाणे हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.Conclusion:गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

जळगाव- ३०.३ मि.मी.
जामनेर- ३२.० मि.मी.
एरंडोल- १९.५ मि.मी.
धरणगाव- २४.९ मि.मी.
भुसावळ- ३५.३ मि.मी.
यावल- २६.० मि.मी.
रावेर- २१.४ मि.मी.
मुक्ताईनगर- २५.३ मि.मी.
बोदवड- २०.३ मि.मी.
पाचोरा- २३.६ मि.मी.
चाळीसगाव- ५.१ मि.मी.
भडगाव- १६.३ मि.मी.
अमळनेर- १६.८ मि.मी.
पारोळा- ९.२ मि.मी.
चोपडा- ३४.७ मि.मी.
एकूण- ३४०.५ मि.मी.

ABOUT THE AUTHOR

...view details