महाराष्ट्र

maharashtra

Gold increased : डाॅलरच्या दरा सोबत सोेन्याचा दरही पाच दिवसात 1100 रुपयांनी वाढले!

By

Published : Dec 6, 2022, 12:23 PM IST

Updated : Dec 6, 2022, 1:26 PM IST

लग्नसराई सुरू झाल्यानंतर सोने- चांदीच्या भावात सतत वाढ होत आहे. त्यात गेल्या 5 दिवसात तर अधिकच वाढ (Gold increased by Rs 1100 in five days) होत आहे. जागतिक पातळीवर मागणी वाढण्यासह भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरचे दर वधारत (Along with the dollar rate) असल्याने सोने- चांदीच्या भावात वाढ होत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

जळगाव:आंतरराष्ट्रीय पातळीवर दर वाढू लागल्याने गेल्या 5 दिवसांपासून सोने- चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. 5 दिवसात सोन्याचे भाव एक हजार 100 रुपयांनी वाढून ५४ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. चांदीतही 2 हजार 700 रुपयांची वाढ होऊन ती 66 हजार 200 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

पाच दिवसात सोने 1100 रुपयांनी वधारले

लग्नसराईमुळे सोने वधारले: लग्नसराई सुरू झाल्यानंतर सोने- चांदीच्या भावात सतत वाढ होत आहे. त्यात गेल्या 5 दिवसात तर अधिकच वाढ होत आहे. जागतिक पातळीवर मागणी वाढण्यासह भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरचे दर वधारत असल्याने सोने- चांदीच्या भावात वाढ होत आहे. 30 नोव्हेंबर रोजी 53 हजार रुपये प्रति तोळ्यावर असलेल्या सोन्याच्या भावात 1 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी वाढ होऊन ते 53 हजार 300 रुपयांवर पोहचले.

डॉलरचे दर वधारत असल्याने: 2 रोजी पुन्हा 500 रुपयांची तर 3 रोजी 150 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर पुन्हा 5 रोजी 150 रुपयांची वाढ होऊन 5 दिवसात सोन्यात एकूण एक हजार 100 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोमवार 5 डिसेंबर रोजी सोने 54 हजार 100 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. चार दिवसांपासून डॉलरचे दर वधारत असल्याने ही वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. १ डिसेंबर रोजी ८१.१२ रुपये दर असलेला डॉलर ५ रोजी ८१.६७ रुपयांवर पोहोचला आहे.

७०० रुपयांची वाढ: चांदीतही २७०० रुपयांची वाढ झाली आहे. अशाच प्रकारे ३० नोव्हेंबर १ रोजी ६३ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १ डिसेंबर रोजी ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर २ रोजी तर एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन चांदी ६५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. ३ रोजी पुन्हा ५०० रुपयांची ३ तर ५ रोजी २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ६६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

Last Updated : Dec 6, 2022, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details