महाराष्ट्र

maharashtra

Diwali 2023 : 'सुवर्णनगरी'त सोन्याला 'झळाळी': दिवाळीत सोनं खरेदीतून झाली 200 कोटींची उलाढाल

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 5:33 PM IST

जळगावात यंदा सोनं खरेदीत 200 कोटींची उलाढाल झाली आहे. सुDiwali 2023 : वर्णनगरी म्हणून देशभरात जळगावची ओळख आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोन्याच्या खरेदीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीच्या पाच दिवसांत 200 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती जळगाव जिल्हा सराफ व्यावसायिक संघटनेचे सचिव स्वरूप लुंकड यांनी दिली आहे.

Diwali 2023
Diwali 2023

स्वरूप लुंकड यांची प्रतिक्रिया

जळगावDiwali 2023 : सुवर्णनगरी अशी जळगावची देशभरात ओळख आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत सोन्याच्या खरेदीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जळगाव जिल्हा सराफ व्यावसायिक संघटनेचे स्वरुप लुंकड यांनी दिली आहे. तरीदेखील जिल्ह्यात 200 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचं लुंकड यांनी म्हटलंय.

सुवर्णनगरीतील सोन्याची खरेदी :सोने खरेदीत देशातील एकूण उलाढालीत जळगाव सोन्याच्या बाजारपेठेचा मोठा वाटा आहे. गेल्या दोन-तीन वर्षात कोरोनाचा काळ होता, त्यामुळं सोनं बाजारात अपेक्षित उलाढाल झाली नव्हती. मात्र, सुवर्णनगरीत यंदा सोनं खरेदीसाठी मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार केला, तर यावर्षी दिवाळीच्या पाच दिवसात सोन्याच्या खरेदीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं जळगावात 200 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचे स्वरुप लुंकड यांनी सांगितलं.

सोन्याच्या दरात वाढ :गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात वाढ झाली असली, तरी खरेदी वाढण्यामागं दोन-तीन कारणं असल्याचं सोनं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. दिवाळी महिन्याच्या सुरुवातीलाच आल्यानं नोकरदार वर्गाचा पगार, बोनस, सातवा वेतन आयोग यामुळं सोने खरेदी वाढली आहे. त्यामुळं साहजिकच सोन्यात गुंतवणूक करण्याकडं लोकांचा कल वाढताना दिसून येत आहे. यंदा ग्राहकांची संख्या वाढल्यानं सोनं व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडं, या दिवाळीत सोनं खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह आहे. येत्या दोन तीन दिवसात आणखी ग्राहक सोन्याची खरेदी करण्याची शक्यता सोनं व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सोन्यामुळं बाजारात पैसा : यंदा राज्यात पर्जन्यमान कमी झालं आहे. त्यामुळं शेतीसह इतर व्यावसायाला त्याचा मोठा फटका बसाला आहे. तरीदेखील जळगावात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. तरी देखील ग्राहक आनंदानं सोनं खरेदी करत आहेत. त्यामुळे जळगावात 200 कोटीची उलाढाल झाल्याचं व्यापारी असोशिएशनच्या सचिवांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Diwali Shopping Of Irshalwadi Children : इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त चिमुकल्या मुला-मुलींच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या खरेदीमुळे फुलले अनोखे हास्य
  2. Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुवर्णनगरी जळगाव ग्राहकांनी गजबजली; सोनं खरेदीसाठी चढाओढ
  3. Dussehra 2023: दसऱ्याच्या मुहूर्तावर गाडी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

ABOUT THE AUTHOR

...view details