महाराष्ट्र

maharashtra

Jalgaon Accident : कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By

Published : Feb 17, 2022, 5:34 PM IST

भडगावच्या यशवंतनगर भागात दीपक वसंत सोनवणे हे वास्तव्यास आहे. त्यांची मोटार सायकल ही १५ फेब्रुवारी रोजी पंक्चर झाली होती. सोनवणे यांचा मुलगा अमोल दिपक सोनवणे व त्याचा मित्र पंकज भारत भोई भडगाव हे दोघे जण मोटार सायकल ढकलत नेऊन पंक्चर काढण्यासाठी जात होते.

Jalgaon Accident
Jalgaon Accident

जळगाव -पंक्चर काढायला मोटरसायकल लोटत घेऊन जाताना कारने दिलेल्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. अमोल दिपक सोनवणे व त्याचा मित्र पंकज भारत भोई अशी मृत मुलांची नावे आहेत. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भडगाव ग्रामीण रुग्णालयासमोर हा अपघात झाला.

भडगावच्या यशवंतनगर भागात दीपक वसंत सोनवणे हे वास्तव्यास आहे. त्यांची मोटार सायकल ही १५ फेब्रुवारी रोजी पंक्चर झाली होती. सोनवणे यांचा मुलगा अमोल दिपक सोनवणे व त्याचा मित्र पंकज भारत भोई भडगाव हे दोघे जण मोटार सायकल ढकलत नेऊन पंक्चर काढण्यासाठी जात होते. रात्री ८.३० वाजता भडगाव ग्रामीण रुग्णालयाजवळ हॉटेल राज पॅलेस समोरून जाणाऱ्या ईको गाडीने बाईकला समोरुन धडक दिली. या धडकेत अमोल जागीच मृत्यू झाला. तर जखमी पंकजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्टेबल विजय जाधव हे करत आहे. या घटनेत दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details