महाराष्ट्र

maharashtra

हिंगोली : गोमांस घेऊन जाणारा ट्रक उलटला

By

Published : Sep 23, 2020, 4:07 PM IST

नागपूरहून हैदराबादला गोमांस घेऊन जाणारा ट्रक हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील आराटी फाट्याजवळ उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकमधील गोमांस रस्त्यावर पसरले आहे.

उलटलेल्या ट्रकची पाहणी करताना पोलीस पथक
उलटलेल्या ट्रकची पाहणी करताना पोलीस पथक

हिंगोली- जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पावसाची रिप-रिप सुरू आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालकाला अंदाज येत नाही. अशातच नांदेडमार्गे गोमांस घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील आराटी फाट्याजवळ घडली. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी, ट्रकमधील सर्व गोमांस रस्त्यावर पडले आहे.

नागपूरहून ट्रक (एम.एच. 27 एक्स 4888) नांदेडमार्गे हैदराबादला गोमांस घेऊन जात होता. नांदेड-अकोला महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, कळमनुरीपासून बाळापूरपर्यंतचा रस्ता खराब आहे. अशातच समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना, गोमांस घेऊन जाणाऱ्या ट्रकचे चाक रस्त्याच्या खाली उतरले, चालकाने वाहनावर ताबा मिळविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. समोरील पूर्ण भाग हा रस्त्याच्या खाली जाऊन ट्रक उलटला.

सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी, ट्रकमधील मात्र गोमांस हे रस्त्यावर पडलेले आहे. अजून तरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, रस्त्यावर पडलेल्या गोमांसाची दुर्गंधी पसरली आहे. या घटनेवरून गोमांसाची ने-आण सुरू आल्याचे चित्र समोर आले आहे.

हेही वाचा -हिंगोली जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details