महाराष्ट्र

maharashtra

हिंगोली जिल्ह्यात संततधार पावासामुळे सोयाबीन मातीमोल, पंचनाम्याची मागणी

By

Published : Sep 19, 2020, 8:39 PM IST

अवकाळी पावसामुळे कोरोना महामारीच्या काळातही शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळी आली आहे. त्यामुळे, नुकसानीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सोयाबीन
सोयाबीन

हिंगोली- शेतकऱ्यांसमोर नेहमी नवनवे संकट उभे राहतात. अशाच विदारक परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचे पीकही नियमित सुरू असलेल्या पावसामुळे हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. आज घडीला शेतशिवारात गुडघाभर पाणी असल्याने अवघ्या १५ ते २० दिवसांवर काढणीयोग्य आलेले सोयाबीन हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

जिल्ह्यात या वर्षी सोयाबीनचा पेरा सर्वात जास्त झालेला आहे. जवळपास एकूण क्षेत्राच्या पावणेदोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. सोबतच कपाशी, मूग, उडीद या पिकांची पेरणीही झाली आहे. मात्र, संततधार पावसामुळे पिके पूर्णत: भिजली आहेत. उभ्या सोयाबीनला कोंब फूटत आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात ही परिस्थिती आहे.

जिल्ह्यामध्ये ९३ मि.मी एवढा पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. फक्त सोयाबीनच नव्हे तर इतर पिकांना देखील पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे हळद पिकावर करपा रोग पडला आहे. त्यापाठोपाठ कपाशी धोक्यात आहे, तर मूग आणि उडीदही मातीमोल हेण्याच्या मार्गावर आहे. अगोदर कोरोनाने आणि नंतर आसमानी संकटमुळे शेतकऱ्यांना आता करायचे तरी काय? हा प्रश्न पडला आहे. सध्याच्या परिस्थितीत भांडवल खर्च तरी निघणार की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

नुकसानीबाबत हिंगोली तालुक्यातील आमला भागात पाहणी केली असता या भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. परिसरातील काही शेतकऱ्यांनी उसनवारी करून खरिपाची पेरणी केली होती. मोठे उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, पावसाने पिकांचे नुकसान झाले. आता शासनाने नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा-स्पेशल : घोडी विकायचायं पण खरेदीसाठी कोणी पुढे येईना; घोडा व्यावसायिकांच्या व्यथा

ABOUT THE AUTHOR

...view details