महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीत सततच्या पावसामुळे सोयाबीन पडले पिवळे; कृषी विभागाकडून पाहणी

By

Published : Aug 28, 2020, 9:03 AM IST

जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान नेहमीच सुरू असल्याने खरीप पिकाची स्थिती ही बऱ्यापैकी आहे. मागील दोन वर्षाची उणीव या वर्षी खरिपाच्या उत्पन्नातून निघेल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसाने खरीप पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे.

soybean-crops-damaged-due-to-rain-in-hingoli-district
हिंगोलीत सततच्या पावसामुळे सोयाबीन पडले पिवळे

हिंगोली- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याच्या मार्गावर आहे. शेगा भरणीला आलेले सोयाबीनचे पीक पावसामुळे पूर्णपणे पिवळे पडले आहे. त्यामुळे उत्पन्नात कमालीची घट होणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांना योग्य औषध फवारणीचे मार्गदर्शन केले जात आहे.

हिंगोलीत सततच्या पावसामुळे सोयाबीन पडले पिवळे
जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान नेहमीच सुरू असल्याने खरीप पिकाची स्थिती ही बऱ्यापैकी आहे. मागील दोन वर्षाची उणीव या वर्षी खरिपाच्या उत्पन्नातून निघेल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसाने खरीप पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्याचे मुख्य पीक म्हणून पाहिले जाणारे सोयाबीन हे आता शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. परंतू, पावसाचे पाणी साचलेल्या ठिकाणी सोयाबीन पिवळे पडून ते खराब होत आहे. तर सोबतच तूर पिकावर मर रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
हिंगोलीत सततच्या पावसामुळे सोयाबीन पडले पिवळे

हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच भविष्यात उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागात तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आर. एस .भालेराव, तालुका कृषी अधिकारी जी. बी. बंटेवाड, मंडळ कृषी अधिकारी जीएफ कच्छवे, बी. बी. गाडगे, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांना योग्य औषध फवारणी संदर्भात मार्गदर्शन करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details