महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विविध मागणीसह मराठा आरक्षणासाठी 'समाधी' आंदोलन

By

Published : Oct 6, 2020, 7:58 PM IST

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावावा या मागणीसाठी भुसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात चार ते पाच जण सहभागी झाले होते. त्यांनी जमिनीत खड्डा करून, स्वतःला अर्धवट झाकून घेऊन घोषणाबाजी करत होते. आंदोलन स्थळी गोरेगाव पोलिसांनी धाव घेतली. विविध मागण्याचे निवेदन हे गोरेगाव पोलिसांना देण्यात आले.

samadhi agitation for maratha reservation with various demands of farmers in hingoli
हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विविध मागणीसह मराठा आरक्षणासाठी 'समाधी' आंदोलन

हिंगोली -सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागणीसह आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आंदोलकाला आदल्याच दिवशी ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्राणा कामाला लागली होती. मात्र, काही उपयोग झाला नव्हता.

अमोल खिल्लारी, राम उदगीरे, विकेश देवकर यांच्यासह इतर शेतकरी ही सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यावर यंदाही कर्जाचा डोंगर वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावावा या मागणीसाठी भुसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात चार ते पाच जण सहभागी झाले होते. त्यांनी जमिनीत खड्डा करून, स्वतःला अर्धवट झाकून घेऊन घोषणाबाजी करत होते. आंदोलन स्थळी गोरेगाव पोलिसांनी धाव घेतली. विविध मागण्याचे निवेदन हे गोरेगाव पोलिसांना देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details