महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीत संचारबंदी असतानाही नियमांचे उल्लंघन, मग नगरपालिकेने उचलले 'हे' पाऊल

By

Published : Jul 12, 2020, 4:28 PM IST

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 18 जुलैपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भाजीपाला, किराणा दुकान आदी सुरू ठेवण्यासंदर्भात तारीख अन् वेळही ठरवून दिली आहे. मात्र हिंगोली शहरात आस्थापने उघडी ठेवण्यासाठी तारखाही ठरवून दिलेल्या असल्या तरीही बऱ्याच जणांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे नगरपालिका कारवाई करण्यासाठी समोर आली आहे.

हिंगोलीत संचारबंदी असतानाही नियमांचे उल्लंघन
हिंगोलीत संचारबंदी असतानाही नियमांचे उल्लंघन

हिंगोली : कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने हिंगोली प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातच संचारबंदी लागू केली आहे. अशातच हिंगोली शहरात आस्थापने सुरू करण्यासंदर्भात दिवसही ठरवून दिले आहेत. त्यानुसार आज केवळ किराणा दुकान अन् स्वीटमार्टच सुरू ठेवण्याची परवानगी असतानाही शहरात बरच काही सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेने त्यांची समजूत काढत दालने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, दुसरीकडे शहरातील रामलीला मैदान परिसरात अतिक्रमण करण्यात आलेली हातगाडी नगरपालिकेने जप्त करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईने मात्र अगोदरच अडचणीत सापडलेले किरकोळ लघु व्यवसायिक पुन्हा अडचणीत सापडणार आहेत.

अगोदरच कोरोनामुळे हतबल झालेले व्यवसायिक हे नगरपालिकेच्या कारवाईने चांगलेच भांबावले आहेत. तर, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीपोटी प्रशासनाच्या वतीने फार बारकाईने खबरदारी घेतली जात आहे. एवढेच नव्हे तर 18 जुलैपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाही, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भाजीपाला, किराणा दुकान आदी सुरू ठेवण्यासंदर्भात तारीख अन वेळ ठरवून दिली आहे. तसेच आरोग्य विभाग हा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या भागात लक्ष ठेऊन असून, त्या भागातील वयोवृध्द व गरोदर मतांची तपासणी करून घेत आहे. तर, दुसरीकडे मात्र हिंगोली शहरात आस्थापने उघडी ठेवण्यासाठी तारखाही ठरवून दिलेल्या असल्या तरीही बऱ्याच जणांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे नगरपालिका कारवाई करण्यासाठी समोर आली आहे.

नगरपालिकेचे कर्मचारी गल्लोगल्ली फिरून वेळेत ठरवून दिलेल्या अस्थापना व्यतिरिक्त इतर आस्थापने सुरू न ठेवण्याच्या सूचना देत आहेत. तर शहरातील अतिशय मधोमध असलेल्या रामलीला मैदानावरील अतिक्रमण केलेल्या फळ विक्रेत्यांचे हातगाडे हे नगरपालिकेने जप्त करून वाहनात हात गाडी भरून हलविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एकंदरीतच नगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील लघु व्यावसायिक हे चांगलेच गोंधळून गेले आहेत. पथकामध्ये नगरपालिकेचे दत्तात्रय शिंदे, पंडित मस्के, विनय साहू यासह कर्मचारी सहभागी झालेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details