महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीला पुन्हा चोवीस तासाच्या विश्रांतीनंतर पावसाने झोडपले, शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पूर्ण गेला

By

Published : Oct 18, 2020, 12:05 PM IST

मोठ्या धीराने मळणी यंत्रातून सोयाबीन काढू पाहतोय मात्र नियमित सुरू असलेल्या पावसामुळे मळणीयंत्र देखील सुडीपर्यंत येत नसल्याचे विदारक चित्र आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आता या निसर्गा समोर पुरता खचला आहे. आता नुकसानीचे पंचनामे नकोत तर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी, एवढीच मागणी आता निसर्गा समोर हतबल झालेल्या बळीराजातूंन केली जात आहे.

hingoli was again beaten by heavy rain after a twenty four hour rest
हिंगोलीला पुन्हा चोवीस तासाच्या विश्रांतीनंतर झोडपले

हिंगोली -जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. जेमतेम एक दिवस काही प्रमाणात पावसाने दडी धरली होती, मात्र 24 तासाच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे उरले-सुरले पीक हे पाण्यात गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. आज घडीला बऱ्याच शेतकऱ्यांनी कापून टाकलेले सोयाबीन परत गोळा देखील केलेले नाही. शेतातील ही विदारक दृश्य पाहून खरोखरच मन अक्षरशः हेलावून जात आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पूर्ण गेला
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 118 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. या पावसामध्ये साधारणपणे 2 लाख 22 हजार 128 हेक्‍टरवरील खरीप पीक हे बाधित झाले आहे. तर आतापर्यंत कृषी विभागाकडून 90 टक्के नुकसानीचे पंचनामे केले आहेत. तर अजूनही पंचनामे सुरूच असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. शहरासह ग्रामीण भागात शनिवारी रात्री पासून उशिरापर्यंत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी खरिपातील आदी पिकांना फटका बसला आहे.

पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे बऱ्यांच शेतकऱ्यांनी मळणी यंत्रातून सोयाबीन काढून घेण्यासाठी सोयाबीनच्या सूर्या उघडून पाहिले. मात्र बऱ्याच दिवसापासून झाकून ठेवलेल्या सुडीतून गरम वाफ येऊन शेंगांना बुरशी लागल्याचे दिसून आले. तरी ही मोठ्या धीराने मळणी यंत्रातून सोयाबीन काढू पाहतोय मात्र नियमित सुरू असलेल्या पावसामुळे मळणीयंत्र देखील सुडीपर्यंत येत नसल्याचे विदारक चित्र आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आता या निसर्गा समोर पुरता खचला आहे. आता नुकसानीचे पंचनामे नकोत तर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी, एवढीच मागणी आता निसर्गा समोर हतबल झालेल्या बळीराजातूंन केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details