महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीत राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये धडक; कोणतीही हानी नाही

By

Published : Aug 6, 2021, 6:45 PM IST

वाहनांमध्ये धडक
वाहनांमध्ये धडक ()

नरसी नामदेव गावापासून काही अंतरावर राज्यपालाच्या ताफ्यातील एका वाहन चालकांने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहन समोरील वाहनावर धडकले. मागे असलेले अग्निशमन दलाचे वाहन सार्वजनिक वाहनाला जोरात धडक दिली.

हिंगोली -महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंगोलीत शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची बैठक व पत्रकारांशी सवांद साधून नरसी नामदेव येथे दर्शनासाठी निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या ताफ्यातील एका वाहन चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तीन वाहने एकमेकांवर धडकली. या धडकेत सुदैवाने कोणतेही हानी झाली नाही. मात्र वाहनाचे नुकसान झाले आहे.

नरसी नामदेव गावापासून काही अंतरावर राज्यपालाच्या ताफ्यातील एका वाहन चालकांने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहन समोरील वाहनावर धडकले. मागे असलेले अग्निशमन दलाचे वाहन सार्वजनिक वाहनाला जोरात धडक दिली. हा अपघात झाल्याचे लक्षात येताच पाठीमागील वाहन चालक सावध झाले. या अपघातात तिनही वाहनांचे फार नुकसान झाले असले तरी सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

पुन्हा वाहन ताफ्यात सामील

किरकोळ वाहनाचे नुकसान झाल्यानंतर दोन वाहने ताफ्यातुन बाहेर काढण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांचे वाहन परत ताफ्यात सहभागी झाले. मात्र या अपघाताची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संत नामदेवाचे दर्शन घेतल्यानंतर समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा -कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक दरीत कोसळला, एक ठार तर 3 गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details