महाराष्ट्र

maharashtra

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता पतीने केला दुसरा विवाह, गुन्हा दाखल

By

Published : May 22, 2021, 10:22 PM IST

पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केल्या प्रकरणी पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली पोलीस ठाणे
हिंगोली पोलीस ठाणे

हिंगोली- पत्नीसोबत हुंड्यावरून भांडण झालेल्या एकाने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता युवतीसह विवाह केला. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल गव्हाणकर (रा. आनंद नगर हिंगोली), असे आरोपी पतीचे नाव आहे. अर्चना आणि अनिल या दोघांचा पंधरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सुरुवातीपासून दोघांचा संसार अगदी सुरळीत सुरू होता. यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र, किरकोळ कारणावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. अनिलने गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण, असा तगादा पत्नीकडे लावला. त्यानंतर पतीने मारहाण करत पत्नीला घराबाहेर काढले. तेव्हापासून अर्चना या आपल्या मुलीसह माहेरीच राहतात तर मुलगा अनिलकडे राहतो. याप्रकरणी पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. मात्र, असे असताना अनिलने एका 22 वर्षीय युवतीसोबत विवाह केला. याबाबत पत्नी अर्चनाने खात्री केली.

एवढ्यानी केला लग्न लावून दिल्याचा आरोप

संजय राजूरकर, वंदना राजूरकर, निलेश संजय राजूरकर (रा. अंबिका टॉकीज जवळ), देवरत्न गव्हाणकर, शोभा देवरत्न गव्हाणकर यांनी लग्न लावून दिल्याचा आरोप अर्चना यांनी केला आहे.

हेही वाचा -वसमत तालुक्यात जमीन हादरली; भूकंप सदृश्य धक्क्यांमुळे ग्रामस्थ भयभीत

ABOUT THE AUTHOR

...view details