महाराष्ट्र

maharashtra

Ambulance And Truck Accident : अपघातग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाचा  अपघातात मृत्यू

By

Published : Nov 23, 2022, 5:23 PM IST

Ambulance And Truck Accident
रुग्णवाहिकेच्या अपघातात चालकाचा मृत्यू ()

रुग्णवाहिका आणि हायवा ट्रकच्या आमोरासमोर झालेल्या धडकेत ambulance and truck accident रुग्णवाहिका चालकाचा जागीच मृत्यू (ambulance driver dies in accident) झाला. अन्य एकाचा मृत्यू झाल्याची घटना 22 नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास डोंगरकडा ते नांदेड मार्गावरील हिवरा फाटा येथे घडली. latest news from Hingoli, Hingoli Crime,

हिंगोली :जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. अपघात झालेल्या अपघातग्रस्ताला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची आणि हायवा ट्रकची धडक (ambulance and truck accident ) झाली. यात, रुग्णवाहिका चालकाचा जागीच मृत्यू (ambulance driver dies in accident) झाला. तर अन्य एकाचा मृत्यू झाल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना 22 नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास डोंगरकडा ते नांदेड मार्गावरील हिवरा फाटा येथे घडली. latest news from Hingoli, Hingoli Crime,

मृतक बळीराम वाघमारे

ट्रक, रुग्णवाहिकेची धड-बळीराम वाघमारे रा. डोंगरकडा अस मयत रुग्णचालकाचे नाव आहे. वाघमारे हे ऑटोने धडक दिलेल्या हिवरा येथील किसन गोवंदे यांना डोंगरकडा येथील रुग्णालयातुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे रुग्णवाहिकाने घेवून जात होते. डोंगरकडा येथून काही अंतरावर गेल्यानंतर हिवरा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या हायवा ट्रक व रुग्णवाहिकेची समोरासमोर जोराची धकड झाली. ही धडक एवढी भयंकर होती की या मध्ये चालक बळीराम वाघमारे यांना जबर मार लागला अन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य किसन गोवंदे यांचा मृत्यू झाला आणि रुग्णवाहिकेतील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

दोघांची प्रकृती चिंताजनक -घटनेची माहिती कळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सपोनि पंढरीनाथ बोधनापोड, जमदार शेख बाबर आणि प्रभाकर भोंग यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी दुसऱ्या वाहनाने नांदेड येथे हलविले. पाच जणांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या भयंकर अपघातामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या विदारक घटनेमुळे डोंगरकडा येथे बऱ्याच घरी चूल देखील पेटली नाही, डोंगरकडा गावावर शोककळा पसरली.

ABOUT THE AUTHOR

...view details