महाराष्ट्र

maharashtra

गोंदियात कोरोनावरील लसींचा साठा दाखल, तीन केंद्रावर होणार लसीकरण

By

Published : Jan 14, 2021, 4:49 PM IST

Updated : Jan 14, 2021, 8:08 PM IST

देशभरात कोरोना योद्ध्यांना १६ जानेवारीला कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. यासाठीची तयार सुरू असून पुण्याहून आज सकाळी गोंदिया जिल्हा परिषदेत लस दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील तीन ठिकाणी लसीकरण केंद्र असून त्या ठिकाणी लस देण्यात येणार आहे.

लस
लस

गोंदिया- जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी असून गोंदिया येथे आज (दि. १४ जाने.) सकाळी १० वाजेच्या सुमारास १० हजार कोरोना प्रतिबंधक लस पुण्याहून जिल्हापरिषद येथे पोहचली आहे. ही लस गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार ४२८ आरोग्य कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील तीन केंद्रांवर दिली जाणार आहे.

लस देताना प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी, तीन लसीकरण अधिकारी व पोलीस कर्मचारी, असे पाच जणांचे पथक तैनात राहणार आहे. ज्यांची पोर्टलवर नोंदणी झाली आहे, त्यांनाच लस दिली जाणार आहे. अधिकृत ओळखपत्राशिवाय कोविड लस मिळणार नाही. लस दिल्यांनतर ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी ज्यांच्या मोबाईलवर संदेश येणार त्यांनाच लस दिली जाणार आहे.

या ठिकाणी दिली जाणार लस

गोंदिया शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा व ग्रामीण रुग्णालय देवरी या तीन ठिकाणी १६ जानेवारीला शंभर जणांना पहिल्या दिवशी लस दिली जाणार आहे.

बोलताना वैद्यकीय अधिकारी

हेही वाचा -तिरोडा पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर धाड; 4 जणांवर गुन्हे दाखल

Last Updated :Jan 14, 2021, 8:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details