महाराष्ट्र

maharashtra

गोंदिया : दारूची तस्करी करणार्‍याला रेल्वे पोलिसांची केली अटक

By

Published : Jun 6, 2021, 4:09 PM IST

दारूची तस्करी करणार्‍या व्यक्तीला गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून एकूण 4 हजार 250 रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

liquor sumgglar arrest in gondia
गोंदिया : दारूची तस्करी करणार्‍याला रेल्वे पोलिसांची केली अटक

गोंदिया - दारूची तस्करी करणार्‍या व्यक्तीला गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून एकूण 4 हजार 250 रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 3 जून रोजी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॉटफार्म क्रमांक 1 वर करण्यात आली. रणबीरसिंग दलिपसिंग चौवकडायत (35) रा. आरटीओ ऑफिस, फुलचुर नाका, गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.

'4 हजार 250 रूपयांची दारू जप्त' -

लोहमार्ग नागपूर पोलीस गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात व प्लॉटफार्मवर पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, आरोपी एक काळ्या रंगाची बॅग घेऊन प्लॉटफार्म क्रमांक 1 च्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून हावडाकडे जाणार्‍या गाडीत चढण्यासाठी प्लॉटफार्म क्रमांक 4 कडे जात होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आवाज देऊन त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने बॅग तेथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. दरम्यान, त्याची बॅगची तपासणी केली असता, त्यात विदेशी दारूच्या 2 लीटरच्या 3 प्लास्टीक बॉटल मिळाल्या. त्यांची किंमत 4 हजार 250 रूपये आहे. तसेच तो ही दारू परराज्यात विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले.

हेही वाचा - गोदावरीच्या प्रदूषित फेसामधून नागरिकांना शोधावा लागतोय रस्ता

ABOUT THE AUTHOR

...view details