महाराष्ट्र

maharashtra

दरेकर महाविकास आघाडीत भांडण लावण्याचे काम करताहेत - जलसंपदा मंत्री

By

Published : Jan 31, 2021, 6:57 PM IST

Updated : Jan 31, 2021, 7:03 PM IST

भाजप सरकारच्या काळात तब्बल 56 हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. त्यांनी कार्यक्षपणे वीज महामंडळ चालवले नाही. त्यामुळे बावनकुळेंनी वीज महामंडळाबद्दल बोलण्याची गरज नाही, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील

गोंदिया- प्रवीण दरेकर हे महाविकास आघाडीत भांडण लावण्याचे काम करत आहेत, असा आरोप करत महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नसल्याचेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील स्पष्ट केले आहे. गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद या कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी ते म्हणाले.

बोलताना मंत्री पाटील

काय म्हणाले होते दरेकर

विजबिलाबाबत राष्ट्रवादी व शिवसेना काँग्रेसला अडचणीत आणत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता.

बावनकुळेंनी वीज मंडळाबाबत बोलण्याची गरज नाही

तर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या काळात कोट्यवधींचे वीज बिल थकीत असताना वीज कंपन्या नफ्यात होत्या, असा दावा करत सरकारने वीज कंपन्यांना पैसे देऊन लोकांची वीज बिले माफ करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, त्यांच्या काळात 56 हजार कोटींचे वीज बिल थकीत आहे. त्यांनी त्यांच्या काळात कार्यक्षमपणे वीज महामंडळ चालवले नाही. त्यामुळे वीज वितरण महामंडळापुढे अनेक प्रश्न उपस्थित आहेत, असे म्हणत बावनकुळेंनी महामंडळाबात बोलण्याची गरज नाही, असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला आहे.

हेही वाचा -गोंदियात पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडला जनावरांचा ट्रक

Last Updated :Jan 31, 2021, 7:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details