महाराष्ट्र

maharashtra

तब्बल १८ महिन्यानंतर गोंदिया-बल्लारशा लोकल सुरू, ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

By

Published : Sep 29, 2021, 9:08 AM IST

Updated : Sep 29, 2021, 10:44 AM IST

तब्बल १८ महिन्यानंतर गोंदिया-बल्लारशा लोकल सुरू, ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट
तब्बल १८ महिन्यानंतर गोंदिया-बल्लारशा लोकल सुरू, ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट ()

रेल्वे विभागाने तब्ब्ल १८ महिन्यानंतर (२८ सप्टेंबर) मंगळवार पासून पुन्हा लोकल, पॅसेंजर गाड्या सुरु केल्या आहेत. गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-कटंगी-बालाघाट या दोन लोकल, आज पासून ट्रॅकवर धावायला सुरवात झाल्या आहेत. या निर्णयामुळे या मार्गावरील प्रवासी आनंदी असल्याचे पाहायला मिळाले.

गोंदिया - रेल्वे विभागाने तब्ब्ल १८ महिन्यानंतर (२८ सप्टेंबर) मंगळवार पासून पुन्हा लोकल, पॅसेंजर गाड्या सुरु केल्या आहेत. गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-कटंगी-बालाघाट या दोन लोकल, आज पासून ट्रॅकवर धावायला सुरवात झाल्या आहेत. या निर्णयामुळे या मार्गावरील प्रवासी आनंदी असल्याचे पाहायला मिळाले.

तब्बल १८ महिन्यानंतर गोंदिया-बल्लारशा लोकल सुरू, ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

तब्ब्ल १८ महिन्या नंतर गाडी सुरू

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वे विभागाने मागील वर्षी मार्च महिन्यात सर्वच प्रवासी रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर सहा महिन्यांनी विशेष गाड्या सुरु केल्या. पण लोकल, पॅसेंजर गाड्या सुरु केल्या नव्हत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवासांना यांचा त्रास सहन करावा लागत होता. त्यातच एस्प्रेसने प्रवास करण्यासाठी तिकिटासाठी अतिरिक्त पैसे मोजून प्रवास करावा लागत होता. मात्र, तब्ब्ल १८ महिन्या नंतरका होईना रेल्वे विभागाने लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी

आज मंगळावर पासून गोंदिया रेल्वेस्थानवरून गोंदिया-बल्लारशा ही गाडी सकाळी ७.४० ला सुटली असून, तर बल्लारशा वरून हीच गाडी २.४० ला सुटणार आहे. मात्र, गोंदियावरून बल्लारशा सकाळी जाणे सोयीचे होणार असले, तर याच गाडीने जाऊन आपली कामे करून परत येण्यासाठी गाडी उपलब्ध होणार नाही. तर बल्लारशावरून सकाळी ६.३० वाजता सुटणारी गाडी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांची आहे.

Last Updated :Sep 29, 2021, 10:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details