महाराष्ट्र

maharashtra

थकीत करामुळे बीएसएनएल कार्यालयासह दोन बँकांचे एटीएम 'सील', नगरपरिषदेची कारवाई

By

Published : Dec 16, 2020, 7:30 PM IST

Updated : Dec 16, 2020, 8:02 PM IST

गोंदिया नगर परिषदेने मालमत्ता थकीत मालमत्ता कर प्रकरणी बीएसएनएनचे कार्यालय व दोन बँकांचे एटीएम सील केले आहे. नागरिकांनी कारवाईपासून वाचण्यासाठी त्वरित करत भरावे, असे आवाहन नगरपरिषेदेचे उपमुख्य अधिकारी विशाल बनकर यांनी केले आहे.

सील करतानाचे छायाचित्र
सील करतानाचे छायाचित्र

गोंदिया - नगरपरिषदेने मालमत्ता कर थकीत असल्याने बीएसएनएलचे कार्यालय बँक ऑफ इंडिया व अ‌ॅक्सिस बँकेचे एटीएम सील केले आहे. यामध्ये बीएसएनएलकडे 2018 पासून साडेपाच लाख रुपयांचा कर थकीत असल्याची माहिती नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी विशाल बनकर यांनी दिली.

बोलताना उपमुख्य अधिकारी

गोंदिया शहराचा विविध विकासकामे निधीविना प्रलंबित आहेत. निधी उपलब्ध करण्यासाठी कर वसूल होणे महत्वाचे असते. गोंदिया नगरपरिषदेचे थकीत कर 11 कोटी रुपयांच्या घरात आहे. कराचा भरणा नागरिकांनी वेळोवेळी करावा, यासाठी नोटिस, पत्रव्यवहार आणि दवंडी देखील देण्यात आली. पण, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नगर परिषदेचे सक्तीने वसुली व जप्तीची मोहिम हाती घेतली आहे.

बीएसएनएलचे कार्यालय व दोन बँकांचे एटीएम सील केल्याने धास्तावले नागरिक

नगरपरिषदेचे कर वसुली व जप्तीची मोहिम सुरू करताच बीएमएनएलचे कार्यालय तसेच अ‌ॅक्सिस व बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर सील केल्याने नागरिक धास्तावले आहे. यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाल्याचे दिसून आले. मात्र, संपूर्ण थकीत कर वसूल होईपर्यंत ही मोहिम सुरुच राहणार असल्याचे बनकर यांनी सांगितले.

हेही वाचा -गोंदियात अनेक दुकानांवर चालला बुलडोजर; नगर परिषदेची पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

हेही वाचा -जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 8 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

Last Updated :Dec 16, 2020, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details