महाराष्ट्र

maharashtra

भामरागड-आलापल्ली मार्गावर नक्षली बॅनर; रस्त्याच्या मधोमध स्फोटके लावल्याचा संशय

By

Published : Mar 3, 2020, 12:35 PM IST

नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील ताडगावजवळ रस्त्याच्या मधोमध दोन डबे ठेवून त्यावर लाल रंगाचे कापड गुंडाळून डब्याच्या दोन्ही बाजूला वायर सोडल्यामुळे त्यात स्फोटके असल्याची भीती निर्माण झाली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

नक्षली बॅनर
नक्षली बॅनर

गडचिरोली -भामरागड तालुक्यातील ताडगावजवळ रस्त्यावर स्फोटके असल्याच्या संशयावरून भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. या ठिकाणी नक्षलवाद्यांनी सोमवारी रात्री लाल रंगाचे दोन बॅनर बांधले होते. रस्त्याच्या मधोमध दोन डबे ठेवून त्यावर लाल रंगाचे कापड गुंडाळून डब्याच्या दोन्ही बाजूला वायर सोडल्यामुळे त्यात स्फोटके असल्याची भीती निर्माण झाली.

ताडगाव हे भामरागड-आलापल्ली मुख्य मार्गावरील गाव असून या गावापासून ताडगाव पोलीस मदत केंद्र एक किलोमीटर अंतरावर आहे. पोलीस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावर नक्षलवाद्यांनी कापडी बॅनर बांधल्याने नक्षवाद्यांची हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा -गावागावातील जातीच्या वाड्यांची हिंसक व्यवस्था बदलावी लागेल - नागराज मंजुळे

या लालरंगाच्या कापडी बॅनरवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी पेरमिली एरिया कमिटी, असा मजकूर लिहलेला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान, भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने या परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details