महाराष्ट्र

maharashtra

ग्रीन झोन गडचिरोली : रेड झोनमधून जिल्ह्यात येण्यास परवानगी नाही

By

Published : May 2, 2020, 8:56 PM IST

गडचिरोली जिल्ह्याबाहेर व आत येणाऱ्या इच्छुकांनी आपली नावे प्रशासनाकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, ग्रीन झोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सध्यातरी रेड झोनमधून प्रवाशांना जिल्ह्यात येण्यास परवानगी नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.

Gadchiroli
रेड झोनमधून जिल्ह्यात येण्यास परवानगी नाही

गडचिरोली - संचारबंदीमध्ये अडकलेल्या कामगार, प्रवासी, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांची माहिती एकत्रीत करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्याबाहेर व आत येणाऱ्या इच्छुकांनी आपली नावे प्रशासनाकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, ग्रीन झोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सध्यातरी रेड झोनमधून येणाऱ्या प्रवाशांना परवानगी नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.

रेड झोनमधून जिल्ह्यात येण्यास परवानगी नाही

शासनाकडून रेड झोनमधील हालचालींवर निर्बंध घातलेले आहेत. त्याठिकाणाहून कोणत्याही व्यक्तीला आतातरी परवानगी देण्यात येणार नाही, असे म्हटले आहे. अडकलेल्या नागरिकांची माहिती एकत्रीत करून नावांची यादी शासनाकडे पाठवण्यात येत आहे. लवकरच राज्य शासनाकडून याबाबत तातडीने प्रक्रिया होणार आहे. ज्यांना जिल्ह्याबाहेर किंवा जिल्हयात यायचे आहे, त्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली प्रशासनाच्या gadchiroli.gov.in या वेबसाईटवर आपली माहिती भरावी किंवा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०७१३२ २२२०३१ या क्रमांकावर दूरध्वनी करून माहिती द्यावी, असे कळवण्यात आले आहे.

जिल्हयांतर्गत व बाहेर प्रवासासाठी परवानगी दिलेल्या ठिकाणी जाण्याकरीता ई-पास आवश्यकच आहे. यासाठी शासनाच्या covid19.mhpolice.in या वेबसाईटवर अर्ज करणे पुर्वीप्रमाणेच आताही आवश्यक आहे. फक्त परवानगीबाबत जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात आले आहेत. संकेतस्थळावर अर्ज केल्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करता प्रत्यक्ष न येता ०७१३२ २२२५०९ या क्रमांकावर ईपास बाबत चौकशी करावी, असेही कळविण्यात आले आहे.



चूकीची माहितीवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अकारण धावाधव करू नका. प्रत्येक माहितीची खात्री करा. अफवांवर विश्वास ठेवून संसर्ग होईल, असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आवश्यक परवानगीबाबत प्रशासन नोंदणी केलेल्या प्रत्येकाला संपर्क साधणार आहे. तसेच याबाबत गडचिरोली जिल्ह्यात नोंदणी केलेल्या अर्जदारांना मेसेजही पाठविला जात आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details