महाराष्ट्र

maharashtra

गडचिरोलीतील मुख्य नद्यांना पूर; 100 गावांचा संपर्क तुटला

By

Published : Aug 8, 2019, 1:30 PM IST

दोन दिवसांपासूम सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे छोट्या नाल्यांसह अनेक नद्यांना पूर आला आहे. गेल्या १५ दिवसात तिसऱ्यांदा भामरागडसह 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यातच एका बारावीची विद्यार्थिनी वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

गडचिरोलीतील मुख्य नद्यांना पूर; 100 गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली -दोन दिवसांपासूम सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे छोट्या नाल्यांसह अनेक नद्यांना पूर आला आहे. पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तिन्ही नद्यांच्या पुराने भामरागडला वेढा घातला असून येथील 100 हून अधिक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. गेल्या १५ दिवसात तिसऱ्यांदा भामरागडसह 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यातच एका बारावीची विद्यार्थिनी वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

गडचिरोलीतील मुख्य नद्यांना पूर; 100 गावांचा संपर्क तुटला

अल्लापल्ली-भामरागड मार्गावरील पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला होता. मात्र पामुलगौतम व इंद्रावती नदीलाही पूर आल्याने या तिनही नद्यांच्या पुराने भामरागडला आता वेढा घातला आहे. येथील बाजारपेठेतील सर्व दुकाने पाण्याखाली गेली असून अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. गेल्या पंधरा दिवसात केवळ एक दिवस मार्ग सुरू झाला होता. मात्र सतत मार्ग बंद असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले असून साधे मीठ मिळणेही कठीण झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून ३०० ते ४०० नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. आताही पाण्याची पातळी वाढतच असल्याने भामरागड वासियांना मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भामरागड-आलापल्ली मार्गावरील कुमारगुडा, आष्टी-आलपल्ली मार्गावरील चौडमपली, अहेरी लगतच्या गडअहेरी, सुभाषनगर या नाल्यांना पूर आल्याने वाहतूक पूर्ण बंद पडली आहे. काल ७ आगस्ट रोजी सुभाषनगर नाल्याच्या पुरात एक बारावीची विद्यार्थिनी वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यातील खोब्रागडी, गाढवी, सती, गोदावरी, वैनगंगा या नद्याही धोक्याच्या पातळीवर आहेत. त्यामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा या पाच तालुक्यातील शेकडो नागरिकांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. उत्तर गडचिरोली भागातही मुसळधार पाऊस सुरू असून गडचिरोली शहरातील नगरपालिका, कृषी महाविद्यालय, अनेक पेट्रोलपंप जलमय झाले आहेत. नाल्या ओसंडून वाहत असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. कालपासून सतत पाऊस सुरू असून अद्यापही पावसाचा जोर कमी झालेला नाही.

Intro:पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम नद्यांच्या पुराचा भामरागडला वेढा : शेकडो घर व दुकानांमध्ये शिरले पाणी

गडचिरोली : जिल्ह्यात 6 ऑगस्टपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे छोट्या नाल्यांसह अनेक नद्यांना पूर आला आहे. भामरागड लगतच्या पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तिन्ही नद्यांच्या पुराने भामरागडला वेढा घातला असून येथील 100 हून अधिक घर व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. गेल्या पंधरा दिवसात तिसऱ्यांदा दोन दिवसांपासून भामरागडसह 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.Body:7 ऑगस्टला पंधरा दिवसानंतर तिसऱ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला होता. अल्लापल्ली-भामरागड मार्गावरील पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला होता. मात्र पामुलगौतम व इंद्रावती नदीलाही पूर आल्याने या तिनही नद्यांच्या पुराने भामरागडला आता वेढा घातला आहे. येथील बाजारपेठेतील सर्व दुकाने पाण्याखाली गेली असून अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. गेल्या पंधरा दिवसात केवळ एक दिवस मार्ग सुरू झाला होता. मात्र सतत मार्ग बंद असल्याने येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून साधे मीठ मिळणेही कठीण झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून तीनशे ते चारशे नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले. मात्र पाण्याची पातळी वाढत असल्याने संपूर्ण भामरागड गावाला पुराने वेढा घातला आहे. आताही पाण्याची पातळी वाढतच असल्याने भामरागड वासियांना मोठ्या नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भामराग- आलापल्ली मार्गावरील कुमारगुडा, आष्टी-आलपल्ली मार्गावरील चौडमपली, अहेरी लगतच्या गडअहेरी, सुभाषनगर या नाल्यांना पूर आल्याने वाहतूक पूर्णत बंद पडली आहे. काल सात आगस्ट रोजी सुभाषनगर नाल्याच्या पुरात एक बारावीची विद्यार्थिनी वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला होता.

जिल्ह्यातील खोब्रागडी, गाढवी, सती, गोदावरी, वैनगंगा या नद्याही धोक्याच्या पातळीवर आहेत. त्यामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा या पाच तालुक्यातील शेकडो नागरिकांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. उत्तर गडचिरोली भागातही मुसळधार पाऊस सुरू असून गडचिरोली शहरातील नगरपालिका, कृषी महाविद्यालय, अनेक पेट्रोल जलमय झाले आहेत. नाल्या ओसंडून वाहत असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. कालपासून सतत पाऊस सुरू असून अद्यापही पावसाचा जोर कमी झालेला नाही.
Conclusion:सोबत विजवल आणि स्थानिक एका नागरिकाचा बाईट आहे

ABOUT THE AUTHOR

...view details