महाराष्ट्र

maharashtra

गोसेखुर्द धरणाच्या पाण्याने गडचिरोली जिल्ह्यात पुराचा महाप्रलय

By

Published : Aug 30, 2020, 4:15 PM IST

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून आजवरचा सर्वाधिक २८ हजार क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आगामी काळात जिल्ह्यात पूर स्थिती भयावह होण्याची शक्यता आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पुराचा महाप्रलय
गडचिरोली जिल्ह्यात पुराचा महाप्रलय

गडचिरोली- मुसळदार पावसामुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे ४ ते ५ मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे, धरणातून २८ हजार क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीने पात्र सोडले असून हजारो एकर शेती पाण्याखाली आली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

वैनगंगा नदीच्या उपनद्या असलेल्या खोब्रागडी, सती, वैलोचना, प्राणहिता नद्या फुगल्या आहेत. त्यामुळे, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यातील काही गावात पुराचे पाणी शिरले असून नागपूर-गडचिरोली, तर आष्टी मार्गे चंद्रपूर-गडचिरोली मार्ग बंद पडला आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून आजवरचा सर्वाधिक २८ हजार क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आगामी काळात जिल्ह्यात पूर स्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. धरणातील पाणी वैनगंगा नदीत प्रवाहित होत असून यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. दोन्ही जिल्ह्यात पाऊस अजिबात नसताना गोसेखुर्दचे पाणी वाढून बिकट पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

या परिस्थितीत देसाईगंज तालुक्यातील सावंगी व धर्मपुरी गावातील ५२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वडसा आरमोरी, मार्कंडा, अहेरीसह सिरोंच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत गडचिरोली-अर्मोरी, गडचिरोली-चामोर्शी, आरमोरी-रामदा, आरमोरी-ब्रह्मपुरी, अहेरी-व्यंकटापूर, आष्टी-चंद्रपूर हे मार्ग बंद आहेत. पुढील काही तासात गोसेखुर्द धरणातून आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा-गडचिरोलीतील चामोर्शी शहर बनले कोरोना 'हॉटस्पॉट'; पुन्हा आढळले 29 रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details