महाराष्ट्र

maharashtra

अस्वलाच्या कळपाचा महिला मजूरावर हल्ला, ४ गंभीर जखमी

By

Published : May 26, 2022, 4:14 PM IST

या घटनेची माहिती मिळताच रामगडचे वनरक्षक बी. डी. रामपूरकर मालेवाडाचे वनरक्षक बाबूराव तूलावी, डि. एम उईके यानी रूग्णालयाला भेट देत जखमीची विचारपूस केली. नियमाप्रमाणे उपचारार्थ आर्थीक मदत करण्याचे आश्वासन दिले. घटनेसंदर्भात पूराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोळे याना भ्रमनध्वनीवर माहिती देत मजूराना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी मनोज दूनेदार यांनी केली आहे.

four  women seriously injured in bear attack in chandrapur
अस्वलाच्या कळपाचा महिला मजूरावर हल्ला

गडचिरोली - जिल्ह्याचा कुरखेडा तालूक्यातील दादापूर येथे तेंदूपत्ता संकलनाकरीता काही महिला गेल्या होत्या. या गावाजवळ असलेल्या कोहका राऊंड कक्ष क्रमांक ४४७ अंतर्गत कवऱ्याल झट्यालच्या जगंलात या महिला मजूरावर अस्वलांच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात ४ महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

तेंदूपत्ता संकलनाकरीता महिला गेल्या होत्या - दादापूर येथील महिला - पूरूष असा १४ मजूरांचा गट गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कवऱ्याल झट्याल जगंलात तेंदूपत्ता संकलनाकरीता पहाटेच गेला होता. तेंदुपत्ता संकलनाचे काम सूरू असतानाच अचानक महिला मजूरावर ५ च्या संख्येत असलेल्या अस्वलाचा कळपाने हल्ला चढवला. या हल्ल्यात सिमा रतिराम टेकाम (२१), लता जिवन मडावी (३५), पल्लवी रमेश टेकाम (२५) व रमशीला आनंदराव टेकाम (३८) या चार महिला गंभीर जखमी झाले. यावेळी घटनास्थळावर असलेले सहकारी मजूर सेवंता उसेंडी,रेशमा उसेंडी,निलीमा उसेंडी,सनया टेकाम, आनंदराव मडावी,जिवन मडावी, रामचंद्र टेकाम, रतिराम टेकाम, आनंदराव टेकाम यानी हो हल्ला करीत मदतीला धावल्याने अस्वलाचा कळपाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहीती मीळताच हरीराम उसेंडी व माजी पंचायत समिति उपसभापति मनोज दूनेदार यानी १०८ क्रमांकाचा रूग्नवाहीकेला काल करीत सर्व जखमींना येथील उपजिल्हा रूग्नालयात उपचारा करीता दाखल केले.

आर्थिक मदत देण्याची मागणी - या घटनेची माहिती मिळताच रामगडचे वनरक्षक बी. डी. रामपूरकर मालेवाडाचे वनरक्षक बाबूराव तूलावी, डि. एम उईके यानी रूग्णालयाला भेट देत जखमीची विचारपूस केली. नियमाप्रमाणे उपचारार्थ आर्थीक मदत करण्याचे आश्वासन दिले. घटनेसंदर्भात पूराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोळे याना भ्रमनध्वनीवर माहिती देत मजूराना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी मनोज दूनेदार यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details