महाराष्ट्र

maharashtra

गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्यास अटक, २ लाखांचे होते बक्षीस

By

Published : Oct 19, 2021, 3:24 PM IST

Updated : Oct 19, 2021, 6:45 PM IST

जहाल नक्षली मंगरु मडावी याला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. या नक्षलवाद्याला अटक करण्यासाठी शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Naxalite Mangru Madavi
गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्यास अटक

गडचिरोली - जहाल नक्षली मंगरु मडावी याला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. या नक्षलवाद्याला अटक करण्यासाठी शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या उपपोस्ट पेरमिली हद्दीत गोपनिय माहिती मिळाली होती. यावेळी पोलीस गस्त घालत असताना जहाल नक्षली मंमरु कटकु मडावी यास अटक करण्यात आली आहे.

गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्यास अटक

हेही वाचा -आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस दलातर्फे मिळाले हक्काचे घरकुल

  • शासनाने केले होते 2 लाखांचे बक्षीस जाहीर -

नागरिकांच्या हत्या करणे तसेच पोस्टवर हल्ले करणे यासारखे हिंसक गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. मंगरु मडावी हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील अशा माजा विसामुंडी पोमके नारगुंडा (ता. भामरागड जि. गडचिरोली) येथील रहिवासी आहे. तो प्रतिबंधीत असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचा वरिष्ठ कॅडर होता. मागील अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर त्याला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. मंगरुला अटक करणाऱ्यांसाठी राज्य शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीसदेखील जाहीर केले होते.

  • नक्षली कारवायांमध्ये सक्रीय -

गडचिरोलीमधील नक्षली कारवायांमध्ये मंगरु हा सक्रीय होता. सामान्य नागरिकांच्या हत्या करणे तसेच पोलीस ठाण्यावर हल्ले करणे यासारखे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. चुर्गी येथील उपसरपंच रामा तलांडी यांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आहे.

हेही वाचा -नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना गडचिरोली पोलिसांनी केला उद्ध्वस्त

Last Updated : Oct 19, 2021, 6:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details