महाराष्ट्र

maharashtra

VIDEO गडचिरोली महापूर : रस्तेच नसल्याने पंचनाम्यासाठी अधिकारी-डॉक्टरांची कसरत

By

Published : Sep 16, 2019, 12:47 PM IST

गेले सहा ते सात दिवस भामरागड गावासह तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्याखाली होती. आता प्रशासनाकडून पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू आहेत. मात्र अनेक गावांमध्ये जाण्यासाठी रस्तेच नसल्याने तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर जीव धोक्यात घालून नाला पार करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विविध सामाजिक संघटनांकडून पूरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. मात्र हे साहित्य पोहोचवण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रस्ते नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टरांची पंचनाम्यासाठी कसरत

गडचिरोली -गेले सहा ते सात दिवस भामरागड गावासह तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्याखाली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सात वेळा भामरागडचा संपर्क तुटला होता.आता प्रशासनाकडून पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू आहेत. मात्र अनेक गावांमध्ये जाण्यासाठी रस्तेच नसल्याने तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर जीव धोक्यात घालून नाला पार करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

रस्ते नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टरांची पंचनाम्यासाठी कसरत

भामरागड तालुक्यातील इरपणार या गावाला जात असताना नाल्यातून वाट काढावी लागत आहे. या नाल्यातील पाण्याला प्रवाह आहे. मात्र तलाठी आणि ग्रामसेवक, आपला जीव धोक्यात घालून नाला पार करत आहेत. तलाठी यांना पोहता येत नसल्याने दोन स्थानिक लोकांच्या साहाय्याने त्यांना उचलून नाला पार करवला जात आहे. विविध सामाजिक संघटनांकडून पूरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. मात्र हे साहित्य पोहोचवण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा -पूरग्रस्त भामरागडच्या मदतीच्या सर्वेक्षणासाठी ५५ पथके रवाना - जिल्हाधिकारी शेखर सिंह

मुसळधार पावसाने भामरागड तालुक्यात महापूरस्थिती निर्माण झाली होती. भामरागडला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे या परीसरातील जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. इतर गावातही पुरामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पुराचे पाणी ओसरले असल्याने जिल्हा प्रशासनाची संपूर्ण टीम भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागात जाऊन पूर ग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करत आहे.

Intro:जीवाचा धोका.... पूरग्रस्त गावात जाण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक करत आहे कसरत

गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सात वेळा भामरागडचा संपर्क तुटला. 7 ऑगस्टची पहाट
भामरागड वासीयांसाठी अत्यंत दुःखद ठरली. तब्बल सहा ते सात दिवस भामरागड गावासह तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्याखाली होती. या महापुराने भामरागड तालुक्यातील नागरिकांचे संसार उध्वस्त करून टाकले. आता प्रशासनाकडून पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू आहेत. मात्र अनेक गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नसल्याने जीव धोक्यात घालून तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर जीव धोक्यात घालून नाला पार करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.Body:मुसळधार पावसाने भामरागड तालुक्यात महापूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले. भामरागडला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर इतर गावातही पुरामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुराच पाणी ओसरले असल्याने जिल्ह्या प्रशासनाची संपूर्ण टीम भामरागड तालुक्याच्या अनेक दुर्गम भागात जाऊन पूर पीडितांचे नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. मात्र अनेक गावात जात असतांना तलाठी आणि ग्रामसेवकाला कस जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत आहे.

भामरागड तालुक्यातील इरपणार या गावाला जात असतांना मधेच असलेल्या एका नाल्यातून वाट काढावी लागत आहे. या नाल्याला मोठया प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे. मात्र तलाठी आणि ग्रामसेवक, आपलं जीव धोक्यात घालून हा नाला पार करत आहे. तलाठी यांना पोहता येत नसल्याने दोन स्थानिक लोकांच्या साहाय्याने तलाठीला उचलून नाला पार करत आहे. तर काही जागी एका लाकडाचा नावेतूनही प्रवास करावा लागत आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. मात्र हे साहित्य पोहोचवण्यासाठी ही तारेवरची कसरत करावी लागत आहे, असे दृश्य कॅमेरा मध्ये कैद झाले आहे.
Conclusion:सोबत चांगले व्हिज्युअल असून जमेल तर पॅकेज करून लावावे, ही विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details