महाराष्ट्र

maharashtra

स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही कोर्लावासीयांचा पायवाटेनेच प्रवास, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By

Published : Apr 27, 2021, 4:07 PM IST

सिरोंचा तालुक्यातील कोर्ला सारखा परिसर भारत स्वातंत्र्याचा 7 दशकानंतरही पक्क्या रस्त्यांविनाच आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

कोर्ला गावातील रस्ता
कोर्ला गावातील रस्ता

गडचिरोली - दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका इंग्रज काळापासून अस्तित्वात आहे. मात्र तालुक्यातील कोर्लासारखा परिसर भारत स्वातंत्र्याचा 7 दशकानंतरही पक्क्या रस्त्यांविनाच आहे. कोर्ला मार्गाचे आठ किमीचे बांधकाम झाल्यास राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाईल. मात्र अडले कुठे? असा कोर्लावासीयांचा प्रश्न आहे

सिरोंचावरून छत्तीसगढ, महाराष्ट्र, तेलंगाणा जोडणारा राज्य महामार्ग आहे. या मार्गवरुन कोर्ला हे गाव फक्त 8 किमीचे अंतरावरच आहे. कोर्लापासून पातगुडेमपर्यंत ह्या 8 कि. मी. रस्त्याच्या बांधकाम केल्यास हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63ला जोढला जाऊन बारमही वाहतूक व्यवस्था निर्माण होऊ शखते.

कोर्ला नागरिकांचा या मागणीकडे स्थानिक लोकप्रतीनिधिंचा दुर्लक्षितपणामुळे आजही येथील नागरिकांना अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे खडतर मार्गानेच प्रवास करावे लागत आहकोर्ला हा गाव सिरोंचा तालुक मुख्यालयापासुन जवळपास 70 कि. मी. अतंरावर आहे. कोपेला पुल्लीगुडेम, किष्टय्यपल्ले, रमेशगुडेम, कर्जेली यापरिसारातील गावांना रस्त्याअभावी आजही नदी, नाले व डोंगर दऱ्यातून वाट काढावी लागते.या गावतील गंभीर रुग्णांना गर्भवतींना वेळीच रुग्णालयात उपचारासाठी नेताना अनेक अडचणी येतात. अतिशय दुर्गम जंगलव्याप्त कोर्ला हा गावची मुख्यरस्ताशी जोळण्यासाठी रस्ता बनविण्याचे आती आवश्यकता आहे, अशी कित्येक वर्षांपासून मागणी केली होती. कोर्ला ग्रामस्तांनी, मात्र लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. म्हणून या कडे वरिष्ट अधिकाऱ्यांनी प्रमुख्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details