महाराष्ट्र

maharashtra

लक्षवेधी लढत : एकीकडे काका-पुतण्या तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच आमने-सामने

By

Published : Oct 18, 2019, 7:49 PM IST

गडचिरोलीती अहेरी विधानसभा क्षेत्रांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. या विधानसभा मतदारसंघात काका-पुतने निवडणूकीसाठी उभे आहेत.

गडचिरोली लक्षवेधी लढत

गडचिरोली - राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी असली तरी अहेरी विधानसभा क्षेत्रांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार आहे. अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा या तालुक्यांचा समावेश असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्र राजकीय निरिक्षांचे अंदाज चुकवण्यास प्रसिद्ध आहे. यावेळी या विधानसभेत तीन दिग्गज 'आत्राम'मध्ये सामना रंगणार आहे. एकीकडे काका-पुतन्याचा तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर ठाकले आहेत. त्यामुळे कुणीही हरला तरी 'आत्राम'च आमदार बनणार हे मात्र निश्चित होईल.

गडचिरोली लक्षवेधी लढत

अहेरी विधानसभा क्षेत्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिला असून यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अहेरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवली आहे. या वेळेसही येथे राष्ट्रवादी काँग्रेसने जागा मागितली होती. मात्र, मागील मंत्रिमंडळ विस्तारमध्ये भाजपचे अमरीश आत्राम यांचे मंत्रिपद काढल्याने इतर पक्षाच्या उमेदवारांना भाजपच्या मेगाभरती जाण्याचे वेध लागले. माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम भाजपच्या मेगा भरतीत जाण्यास इच्छुक होते. धर्मराव बाबा आत्राम हे अमरिश आत्राम यांचे काका आहेत.

यासाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात होते, त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, अहेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला राखीव असल्याने काँग्रेसच्या दावेदारीचा प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम भाजपच्या वाटेवर असल्याचे माहीत होताच माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेसतर्फे ऑफर देण्यात आली आणि दीपक आत्राम यांनी ती ऑफर स्वीकारली.

2 ऑक्टोंबरला काँग्रेसने अंतिम यादी जाहीर केली. ज्यामध्ये अपक्ष आमदार दीपक आत्राम यांचे नाव आले आणि या नावाने विधानसभा क्षेत्रांमध्ये खळबळ माजली. सकाळी तीन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसने आपली अंतिम यादी जाहीर केली. ज्यामध्ये माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांचं नाव आले. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती असली तरी अहेरी विधानसभा क्षेत्रांमध्ये वेगळे चित्र बघायला मिळत आहे. धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, अमरीश आत्राम भाजपकडून तर दीपक आत्राम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून रिंगणात उभे आहेत. त्यामुळे येथे कोणीही हरला तरी आमदार 'आत्राम'च बनणार आहे.

Intro:लक्षवेधी लढत : एकीकडे काका-पुतण्या तर दुसरीकडे काँग्रेस-राकाँ समोरासमोर

गडचिरोली : राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी असली तरी अहेरी विधानसभा क्षेत्रांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार आहे. अहेरी ,भामरागड ,सिरोंचा ,एटापल्ली , मुलचेरा या तालुक्यांचा समावेश असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्र राजकीय निरिक्षांचे अंदाज चुकविण्यास प्रसिद्ध आहे. यावेळी या विधानसभेत तीन दिग्गज 'आत्राम'मध्ये सामना रंगणार आहे. एकीकडे काका-पुतन्याचा तर दुसरीकडे कॉंग्रेस-राकॉं समोरासमोर ठाकले आहेत. त्यामुळे कुणीही हरला तरी 'आत्राम'च आमदार बनणार हे मात्र निश्चित आहे.Body:अहेरी विधानसभा क्षेत्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिला असून यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अहेरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवली आहे. या वेळेसही येथे राष्ट्रवादी काँग्रेसने जागा मागितली होती. मात्र मागील मंत्रिमंडळ विस्तारमध्ये भाजपचे अमरीश आत्राम यांचे मंत्रिपद काढल्याने इतर पक्षाच्या उमेदवारांना भाजपच्या मेगाभरती जाण्याचे वेध लागले. माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम भाजपच्या मेगा भरतीत जाण्यास इच्छुक होते. धर्मराव बाबा आत्राम हे अमरिश आत्राम यांचे काका आहेत.

यासाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात होते आणि अनेक प्रयत्न केले. मात्र अहेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला राखीव असल्याने काँग्रेसच्या दावेदारीचा प्रश्नच नव्हता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम भाजपच्या वाटेवर असल्याचे माहीत होताच माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेसतर्फे ऑफर देण्यात आली आणि दीपक आत्राम यांनी ती ऑफर स्वीकारली.

2 ऑक्टोंबर रोजी काँग्रेसने अंतिम यादी जाहीर केली. ज्यामध्ये अपक्ष आमदार दीपक आत्राम यांचं नाव आलं आणि या नावाने विधानसभा क्षेत्रांमध्ये खळबळ माजली. तर सकाळी तीन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसने आपली अंतिम यादी जाहीर केली. ज्यामध्ये माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांचं नाव आलं. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती असली तरी अहेरी विधानसभा क्षेत्रांमध्ये वेगळे चित्र बघायला मिळत आहे. धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, अमरीश आत्राम भाजपकडून तर दीपक आत्राम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून रिंगणात उभे आहेत. त्यामुळे येथे कोणीही हरला तरी आमदार 'आत्राम'च बनणार आहे.
Conclusion:सोबत तीनही उमेदवार यांचे पासपोर्ट आणि व्हिज्युअल आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details