महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमधील यात्रा, उरुस रद्द

By

Published : Feb 7, 2021, 5:15 PM IST

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, मात्र गर्दी वाढल्यास कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्वच यात्रा, जत्रा आणि इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेवाची यात्रा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमधील यात्रा, उरुस रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमधील यात्रा, उरुस रद्द

गडचिरोली -सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, मात्र गर्दी वाढल्यास कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्वच यात्रा, जत्रा आणि इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेवाची यात्रा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमधील यात्रा, उरुस रद्द

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव यात्रेसोबतच हजरत वली हैदरशाह बाबाचा ऊरुस देखील रद्द करण्यात आला आहे. तसेच इतर यात्रांना देखील परवानगी नाकारण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदा मार्कंडादेवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details