महाराष्ट्र

maharashtra

भुरट्या चोरांनी चक्क 100 क्विंटल कांद्याची केली चोरी

By

Published : Oct 12, 2021, 10:30 PM IST

Updated : Oct 12, 2021, 10:37 PM IST

धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील सुभाष शिंदे हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. शिंदे यांची या शिवारामध्ये नागपूर-सुरत महामार्गालगत शेती आहे. याच शेतीमध्ये त्यांनी कांदाचाळ उभारली आणि त्याठिकाणी सुमारे दीडशे क्विंटल कांदा साठवून ठेवला होता.

thieves stole about 100 quintals of onions in dhule
भुरट्या चोऱ्यांनी चक्क 100 क्विंटल कांद्याची केली चोरी

धुळे - जिल्ह्यात भुरट्या चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर-सुरत या महामार्गालगतच्या एका शेतकऱ्याच्या शेतात कांदाची चाळ उभारलेली होती. त्या चाळीत सुमारे दीडशे क्विंटल कांदा होता. सध्या कांद्याला बाजारात चांगला दर मिळत असल्याने चोरट्यांनी या चाळीवर डल्ला मारला आहे.

कांदा उत्पादक शेतकरी सुभाष शिंदे यांची प्रतिक्रिया

हातातोंडाशी आलेला घास चोरट्यांनी हिरावून नेला -

जिल्ह्यातील कुसुंबा गावातील सुभाष शिंदे हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. शिंदे यांची कुसुंबा शिवारामध्ये नागपूर-सुरत महामार्गालगत शेती आहे. याच शेतीमध्ये त्यांनी कांदाचाळ उभारली आणि त्याठिकाणी सुमारे दीडशे क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. कांद्याला बाजारात चांगला दर मिळत असल्याने ते हा विक्रीसाठी नेणार होते. मात्र त्याआधीच कांदाचाळीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. कांद्या चाळीतून तब्बल 100 क्विंटल कांदा भोरट्या चोरट्यांनी चोरून नेला आहे. हातातोंडाशी आलेला घास चोरट्यांनी हिरावून नेल्याने सुभाष शिंदे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या कांद्यातून दोन पैसे मिळतील, कर्ज फेडू या विचारात ते असताना चोरट्यांनी त्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.

पंधरा दिवसात दुसरी घटना -

धुळे तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दोन शेतकऱ्यांचा कांदा चोरीला गेला आहे. कांदा चोरीची या पंधरा दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे. याआधीही नेर शिवारामध्ये अशाच पद्धतीने 40 क्विंटल कांद्याची चोरी झाली होती.

पोलिसांसमोर मोठे आव्हान -

धुळे तालुक्यात गेल्या महिन्याभरात कांदा चोरीचे सत्र सुरू आहे. प्रामुख्याने महामार्गालगत असलेल्या शेतीमधील कांदा चाळींना चोरट्यांनी लक्ष केले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या बाईक राईडर तरुणीचा अपघातात मृत्यू

Last Updated : Oct 12, 2021, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details