महाराष्ट्र

maharashtra

साक्री पोलिसांनी आठ दुचाकींसह दोन चोरट्यांना घेतले ताब्यात

By

Published : Mar 17, 2021, 8:34 PM IST

Updated : Mar 17, 2021, 10:20 PM IST

धुळे जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी याबाबत तपास करत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

bike
दुचाकी

धुळे- साक्री परिसरात अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. अशाच एका चोरीसंदर्भात साक्री पोलीस तपास करत होते. त्यासंदर्भात पोलिसांनी दोन चोरट्यांना गजाआड केले असून त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. ज्या नागरिकांच्या दुचाकीचोरीला गेल्या असतील, त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

धुळे साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या फाटकाजवळ लावलेली दुचाकी 14 मार्चला चोरी गेली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत रमेश हाळनरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने साक्री, पिंपळनेर, नेर, नामपूर कुसुबा या परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेल्या सर्व दुचाक्या सानी तालुक्यातील भडगाव येथील सजन देवा सोनवणे यास विकल्या असल्याचे सांगितले तालुक्यातील राजापूर येथील पोलिसांनी त्याला घेतले.

Last Updated :Mar 17, 2021, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details