महाराष्ट्र

maharashtra

धुळे जिल्हा परिषदेकडून 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरेदी

By

Published : May 10, 2021, 3:22 PM IST

शहरी भागात बेड उपलब्ध होत नसल्याने तसेच शहरापर्यंत पोहचू न शकणाऱ्या रुग्णांसाठी आत्ता ग्रामीण भागातच ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले असून यामुळे ग्रामीण भागातच रुग्णांना ऑक्सिजन ची सोय होणार आहे.

धुळे जिल्हा परिषद
धुळे जिल्हा परिषद

धुळे -जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता कोविड सेंटर सक्षम करण्याचा निर्णय धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. धुळे जिल्हा परिषदेने 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केल असून ग्रामीण भागातील कोविड सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयात हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लावण्यात येणार आहेत.

200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरेदी

जिल्ह्यात कोरोनाने 40 हजाराचा टप्पा ओलांडला असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यात अनेकदा शहरी भागात बेड उपलब्ध होत नसल्याने तसेच शहरापर्यंत पोहचू न शकणाऱ्या रुग्णांसाठी आत्ता ग्रामीण भागातच ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले असून यामुळे ग्रामीण भागातच रुग्णांना ऑक्सिजन ची सोय होणार आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्येच ऑक्सिजन तयार होत असल्याने ऑक्सिजन सिलेंडरचीही बचत होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांनी सांगितले आहे. एकंदरीतच कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट येऊ शकते या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे.

हेही वाचा -बोईसरमधील तुंगा कोरोना रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details