महाराष्ट्र

maharashtra

Befriending Raping With Girl : खोटे नाव सांगून तरुणीशी रिलेशन अन् बलात्कार; गुन्हा दाखल

By

Published : Dec 2, 2022, 8:07 PM IST

एका मुस्लीम युवकाने तरुणीला त्याचे खोटे नाव सांगून (telling false name Rape case) तिच्याशी रिलेशन ठेऊन तिच्यावर बलात्कार (Befriending raping with Hindu girl) केला. लग्नानंतर वास्तव समोर आले. यानंतर तरुणीच्या सासऱ्याने पीडितेशी अनैसर्गिक संभोग केला. याप्रकरणी धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल (Rape case filed against husband father) केला आहे. latest news from Dhule, Dhule crime

Befriending Raping With Girl
खोटे नाव सांगून तरुणीशी रिलेशन अन् बलात्कार

धुळे : एका मुस्लिम युवकाने एका २४ वर्षीय हिंदू युवतीला खोटे नाव सांगून (telling false name Rape case) तिच्याशी रिलेशनशिप ठेवून तिच्यावर बलात्कार (Befriending raping with Hindu girl) केला. यात त्या युवकाच्या बापाने देखील पीडितेवर अनैसर्गिक संभोग केला. त्या युवकाने पीडितेस मोटारसायकलच्या सायलन्सरचा चटका लावून दुखापत केली. सासूने देखील पीडितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. धुळे शहरातील देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला या प्रकरणात गुन्हा दाखल (Rape case filed against husband father) करण्यात आला आहे. latest news from Dhule, Dhule crime

काय आहे प्रकरण : पोलीस भरतीच्या क्लासमध्ये एका २४ वर्षीय युवतीशी मैत्री करून तिला फिरायला घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध करून तिच्या न कळत पीडित युवतीचे अर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार करणारा युवक अर्षद सलीम मलिक हा मुस्लिम समाजाचा असताना देखील त्याने त्याचे नाव हर्षद माळी सांगून पीडितेस अमळनेर येथे रिलेशनशिपचे कागदपत्रे तयार करून घेऊन तिला उल्हासनगर येथे घेऊन गेला. आरोपीने तिच्याशी पुन्हा शरीर संबंध करून सासरा सलीम मलिक याने पीडितेवर अनैसर्गिक संभोग केला.

पीडितेच्या हाताला सायलेन्सरचा चटका :सासू तस्लिम सलीम मलिक हिने पीडितेचा शारीरिक, मानसिक छळ केला. तसेच पती अर्षद सलीम मलिक याने पीडितेने लग्नाची एक तोळे वजनाची पोत दिली नाही म्हणून पीडितेच्या हाताला मोटरसायकलच्या सायलन्सरचा चटका देऊन पीडितेस दुखापत केली शिवीगाळ, दमदाटी केली. देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. सन २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीतही घटना घडलीय. आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details