महाराष्ट्र

maharashtra

Tiger Killed Woman : वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; चंद्रपुरात वर्षभरात 50 जण वाघांच्या भक्ष्यस्थानी

By

Published : Dec 15, 2022, 6:14 PM IST

Updated : Dec 15, 2022, 8:05 PM IST

चंद्रपूरहून सुमारे 60 किलोमीटर (Chandrapur Tiger Attack) अंतरावर असलेल्या साओली पर्वतरांगेतील खडी गावाजवळील शेतात कापूस वेचत होती. त्यावेळी वाघाने तिच्यावर हल्ला करून तिची हत्या केली (tiger Killed Woman), असे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी सांगितले. (tiger attacked and killed woman in Chandrapur).

Etv Bharat
Etv Bharat

चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी वाघाने 50 वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. (tiger attacked and killed woman in Chandrapur). वनविभागाच्या अधिकाऱ्याने याप्रकरणी माहिती दिली आहे. स्वरूपा तेलेटीवार असे या मृत महिलेचे नाव आहे.

जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ : ही महिला चंद्रपूरहून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या साओली पर्वतरांगेतील खडी गावाजवळील शेतात कापूस वेचत होती. त्यावेळी वाघाने तिच्यावर हल्ला करून तिची हत्या केली, असे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये जंगली प्राण्यांच्या मानवांवरील हल्यांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या मांजरांच्या हल्ल्यात यावर्षी एकूण 50 जणांचा मृत्यू झाला आहे, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. यापैकी चार हल्ले वाघांचे तर सहा हल्ले बिबट्यांचे होते, असेही ते म्हणाले.

वनमंत्र्यांची याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी :दरम्यान, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना चंद्रपुरातील वाघ-मानव संघर्ष रोखण्यासाठी योग्य पावले उचलण्यास सांगितले. जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी मूल आणि सावली तालुक्‍यांमध्ये वाघांच्या वेगवेगळ्या हल्ल्यात दोन जण ठार झाले, तर खेडी येथे गुरुवारी एका महिलेचा मृत्यू झाला. वाघ-मानव संघर्ष रोखण्यात अधिकारी अपयशी ठरल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Last Updated :Dec 15, 2022, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details