महाराष्ट्र

maharashtra

तेलंगाणातील अपघातात चंद्रपुरातील दोघांचा मृत्यू

By

Published : Dec 27, 2019, 3:04 PM IST

तेलंगणातील मंचेरियाल येथे झालेल्या अपघातामध्ये चंद्रपुरातील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अमोल मल्ला बालुगवार आणि महेश बिरा देवावार, अशी मृतांची नावे आहे.

mancherial telangana accident
तेलंगणातील अपघातात चंद्रपुरातील दोघांचा मृत्यू

चंद्रपूर - तेलंगाणातील मंचेरियाल येथे झालेल्या अपघातामध्ये चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अमोल मल्ला बालुगवार आणि महेश बिरा देवावार, अशी मृतांची नावे आहे. दोघांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

तेलंगणामध्ये झालेला अपघात

अमोल आणि महेश दोघेही जेसीबी चालण्याचे काम करतात. तेलंगणातील मंचेरियाल येथे त्यांचे काम सुरू होते. गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जेसीबीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला जेसीबी उभी करून दोघेही दुरुस्तीचे काम करीत होते. त्यावेळी भरधाव येणाऱ्या कारने दोघांनाही धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. अमोल हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे, तर महेश देवावार याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.

Intro:तेलंगणातील अपघातात चंद्रपूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू


चंद्रपूर

तेलंगणात झालेल्या भिषणा अपघातात गोंडपिपरी तालूक्यातील भंगाराम तळोधी येथिल दोन यूवकांचा मृत्यू झाल्याची दूदैवी घटना घडली.अमोल मल्ला बालुगवार ,महेश बिरा देवावार अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.


प्राप्त माहीतीनुसार मृतक अमोल बालुगवार व महेश देवावार हे दोघे जेसीपी चालवण्याचे काम करतात. तेलंगणातील मंचेरीयाल येथे काम सूरु होते. गुरुवारला 8 वाजताचा सूमारास जेसीपी मध्ये बिघाड आला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला जेसिबी उभी करुन दोघे दुरुस्तीचे काम करित होते. त्याच वेळेस भरधाव येणाऱ्या कारने दोघांना धडक दिली.या धडकेत दोघेही गंभिर जखमी झालेत. उपचारासाठी रुग्णालयात दोघांना हलविण्यात आले.मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.अमोल हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता मुलगा होता.त्याच्या पच्यात आई,वडील,बहीण आहे. तर महेश देवावार याच्या पच्यात आई वडील भाऊ असा परिवार आहे.
अमोल व महेश च्या मृत्यूची बातमी मिळताच भंगाराम तळोधी गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.Body:फोटोConclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details