महाराष्ट्र

maharashtra

धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात पर्यटनाकरिता गेलेल्या दोघांचा मृत्यू, पाच जण गंभीर

By

Published : Apr 9, 2023, 11:27 AM IST

पर्यटनासाठी जंगलात गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. यात दोन जणांचा मृत्यू तर अन्य पाच जण गंभीत जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीमध्ये महिला आणि सहा महिन्यांच्या बाळालाही समावेश आहे.

मधमाशी हल्ला
bee attack on tourists in Chandrapur

चंद्रपूर : नागपूरचे रहिवासी अशोक विभीषण मेंढे (६२) आणि गुलाबराव पोचे (५८) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना तळोधी बाळापूर वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोविंदपूर परिसरात काल दुपारच्या सुमारास घडली.

शनिवारी रात्रीपर्यंत वनविभाग आणि पोलीस विभागाने शोधमोहीम राबविली. गुलाबराव यांना गंभीर अवस्थेत डोंगरावरून खाली उतरवून रुग्णवाहिकेच्या दिशेने आणले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर डोंगराच्या माथ्यावर मधमाशांच्या दंशामुळे अशोक मेंढे मृतावस्थेत आढळून आला. यापूर्वी देखील येथे मधमाश्यांचे असे अनेक हल्ले झाले आहेत. ही गंभीर घटना लक्षात घेऊन पेरजागड परिसर सध्या वनविभाग आणि पोलिसांनी पर्यटनासाठी बंद केला आहे. खरे तर हजारो पर्यटक या डोंगर संकुलाला भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटतात तर काही श्रद्धेपोटी येथे येतात. मात्र याठिकाणी मधमाशांचा वावर असल्याने असे प्रकार अनेकदा घडत आहेत. मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेकदा पर्यटक जखमी होतात. मात्र, आज या घटनेमुळे 2 जणांना जीव गमवावा लागला.



टुरिंग कंपनी टाकत आहे पर्यटकांचा जीव धोक्यातवनविभागाने येथे पर्यटनासाठी वारंवार नकार देऊनही काही नागपूरच्या टूर अँड ट्रॅव्हल्स पर्यटकांना आकर्षक दाखवून येथे आणतात. सकाळचा सूर्योदय आणि रात्रीचा शिबिर, रात्री नृत्य आणि रात्री पर्वती ट्रेकिंगचे आमिष दाखवून नागपूरच्याच एका पर्यटक कंपनीने येथे नाईट कॅम्प लावला होता. वाघ, बिबट्या, अस्वल, मधमाशांसारखे घातक प्राणी रात्रंदिवस येथे फिरत असतांना एकदा त्याने ट्रॅकिंग देखील केले होते, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी उमरेडमधील काही लोकांवर मधमाशांनि हल्ला चढवला होता. त्यांना देखील गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

डंखाचा वापर वेदनाशामक म्हणून केला जातो-मधमाश्या माणसाच्या मित्र मानल्या जातात. कारण त्यांच्यापासून मिळणारा मध हा औषधी गुणधर्माचा असतो. मधमाशांच्या डंखाचा वापरही वेदनाशामक म्हणून केला जातो. बिहारमधील निशांतने बी स्टिंगचा व्यवसाय सुरू करून अनेकांना चकित केले आहे. मधमाशांचा डंख घेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा उपयोग आजार बरा करण्यासाठी केला जातो. निशांत सांगतात, 'हा स्टिंग अनेक प्रकारचे त्वचारोग, संधिवात दूर करण्यासाठीही या स्टिंगचा वैद्यकीय वापर केला जात आहे.

हेही वाचा-Project Tiger : देशातील वाघांची आकडेवारी आज होणार जाहीर, पंतप्रधान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details