महाराष्ट्र

maharashtra

Chandrapur Accident : टोल चुकविण्याच्या नादात ट्रॅव्हल्स पलटली; दोघांचा मृत्यू 17 गंभीर

By

Published : Jan 28, 2023, 12:22 PM IST

छत्तीसगड येथील प्रवाशांना हैदराबादला घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स चंद्रपूर येथे पलटली. टोल चुकविण्याच्या नादात चालकाने माणिकगडवरून मूर्ती-धानोरा-स्टेशन विरूर ते तेलंगणा अशा आडमार्गाने ट्रॅव्हल्स कच्च्या रत्याने नेली होती. मात्र रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला.

Chandrapur Accident
ट्रॅव्हल पालटली

चंद्रपूर : टोलनाक्यावर लागणारा कर वाचवण्यासाठी कच्च्या रस्त्याने ट्रॅव्हल्स नेण्याच्या नादात ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली. रस्ता अरुंद असल्याने चालकाचे ट्रॅव्हल्सवरचे नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन-धानोरा मार्गावर घडली. जखमींना राजुरा, चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. छत्तीसगड येथील प्रवाशांना ही ट्रॅव्हल्स हैदराबाद येथे घेऊन जात होती.

हैदराबादला मजूर घेऊन ही ट्रॅव्हल्स जात होती : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशनजवळ छत्तीसगडच्या नावागळ तालुक्यातून हैदराबादला मजूर घेऊन ही ट्रॅव्हल्स जात होती. रात्री 2:30 वाजताच्या दरम्यान विरूर ते धानोरामधे ही ट्रॅव्हल्स पलटल्याची घटना घडली आहे. ट्रॅव्हल्सखाली दबून रात्री एका मजुराचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत असताना त्याचा मृत्यू झाला. एकूण 37 प्रवाशांपैकी 17 प्रवाशी जखमी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी काहींना उपजिल्हा रुग्णालय राजुरा, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, इथे भरती करण्यात आले आहे.

चालकाचा अंदाज चुकल्याने अपघात : अपघात झालेली ट्रॅव्हल्स रायपूर येथील कंपनीची आहे. अवैधरित्या मजूरांची ने-आण ही ट्रॅव्हल्स करीत होती. ट्रॅव्हल्स 27 तारखेला सकाळी रायपूर येथून सुटली व हैद्राबाद येथे सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पोहोचणार होती. चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतूक करताना महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील टोलनाका चुकविण्याचा वाहन चालकाचा हेतू होता. राजुरा येथून असिफबाद रोडने सरळ मार्गे न जाता माणिकगडवरून मूर्ती-धानोरा-स्टेशन विरूर ते तेलंगणा अश्या आडमार्गाने जात होता. रस्त्यावर समोरून येणाऱ्या हायवा ट्रकला रस्ता देण्याच्या हेतूने रोड सोडून ट्रॅव्हल्स खाली उतरवण्याचा चालकाचा मानस होता. मात्र, ट्रॅव्हल्स उलटली. या परिसरात रात्री वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असते. मोठमोठे हायवा आणि ट्रकने ही तस्करी केली जाते. याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. अशातच ट्रॅव्हल्सचा अपघात झाला.

हेही वाचा :Nana Patole On Satyajeet Tambe : आम्हाला संशय होताच! सत्यजित तांबेंबाबत नाना पटोलेंचे वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details