महाराष्ट्र

maharashtra

Sudhir Mungantiwar On Shivsena भाजपला कमळाबाई संबोधने म्हणजे स्त्रीचा अवमान करणे; मुनगंटीवारांची सेनेवर टीका

By

Published : Sep 3, 2022, 4:59 PM IST

Sudhir Mungantiwar On Shivsena
Sudhir Mungantiwar On Shivsena

Sudhir Mungantiwar On Shivsena सेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' वर्तमानपत्रात भाजपबाबत कमळाबाई असा उल्लेख Kamalabai is mentioned about BJP करण्यात आल्याने यावर भाजपकडून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

चंद्रपूरभाजपला 'कमळाबाई' संबोधल्याने जर भाजपचा अपमान होत असं वाटत असेल, तर ही बाब शिवसेनेची मानसिकता दर्शवते. स्त्री म्हणजे अबला, कमजोर आहे. या मानसिकतेतुन भाजपला लक्ष केले जात आहे, अशी टीका राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार Senior BJP leader Sudhir Mungantiwar यांनी केली आहे. सेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' वर्तमानपत्रात भाजपबाबत कमळाबाई असा उल्लेख Kamalabai is mentioned about BJP करण्यात आल्याने यावर भाजपकडून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका

कुठलीही बाई ही सर्वात आधी एक आई असते. एखाद्याला हिनवण्यासाठी जर बाई असा उल्लेख होत असेल, Kamalabai is mentioned about BJP तर यावरून स्त्री विषयी किती हीन भावना आहे. हे लक्षात येते, असे मुनगंटीवार आज चंद्रपुरात एका कार्यक्रमादरम्यान बोलले आहे.

मोदींना पर्याय असता तर शोधाशोध करण्याची वेळ आली नसतीपंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या विरोधात पर्याय उभा करण्यासाठी शरद पवार हे आता अनेक नेत्यांची भेट घेणार आहेत. यावर मुनगंटीवारांनी भाष्य केले आहे. जर मोदींच्या विरोधात खरंच पर्याय उपलब्ध असता, तर शोधण्याची वेळ आली नसती. एव्हरेस्ट पर्वताला शोधावं लागतं का ? अशा शब्दांत त्यांनी मोदींना कुठलाही पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मागच्या सरकारचा निर्णय योग्यगडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर Kamalapur in Gadchiroli district येथील हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरात येथे हलविण्यात आले आहे. याबाबत वन्यप्रेमींकडून सर्वत्र टीका होत आहे. हा निर्णय आमच्या काळात झाला नाही. मात्र तरीही हा निर्णय योग्य होता. कारण 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या हत्तीची निगा राखण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे, ती आपल्याकडे नाही. त्यासंबंधी डॉक्टर आणि त्यावर होणारा खर्च हा एक मोठा प्रश्न होता. जिथे हे सर्व हत्ती चाललेय तिथे ही सर्व यंत्रणा आहे. या प्राण्यांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे मागच्या सरकारचा हा निर्णय योग्य होता, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचाTwitter War of BJP and Congress: भाजप अन् काँग्रेसचे ट्विटर युद्ध; कारगिल शहिदांच्या भूखंडावरून रंगला वाद

ABOUT THE AUTHOR

...view details