महाराष्ट्र

maharashtra

Soybean: चंद्रपुर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन वाढणार, 4 लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By

Published : May 14, 2022, 5:13 PM IST

Soybean

सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या दोन्ही पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार या वर्षी जिल्ह्यात तब्बल 4 लाख 71 हजार हेक्टर खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे.

चंद्रपूर - राज्यात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या दोन्ही पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार या वर्षी जिल्ह्यात तब्बल 4 लाख 71 हजार हेक्टर खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे.


मागील काही वर्षांपासून कापशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव जाणवत आहे. भाव मिळत असला तरी गुलाब बोंडअळीचे संकट आहे. त्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनकडे वळण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. जिल्ह्यात 4 लाख 71 हजार 761 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात येणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बी, बियाणे, खते, किटकनाशके आणि पैशाची जुळवाजुळव करीत आहेत.

जिल्ह्यात प्रामुख्याने धान, सोयाबीन आणि कापसाची लागवड करण्यात येते. सोबत तूर, ज्वारी आणि अन्य पिकांचाही समावेश आहे. जिल्ह्यात धानाचे क्षेत्र 1 लाख 84 हजार 290 हेक्टर क्षेत्र आहे. यात आणखी काही हेक्टरवर वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे.

सोयाबीन उत्पादनाचे लाभ -सोयाबीन क्षेत्र 65 हजार 62 हेक्टर आहे. सोयाबीनला ३ ते ४ हजार रुपये क्किंटल भाव मिळाला. सोयाबीन हे 90 दिवसांचे पीक आहे. हे पीक घेतल्यानंतर शेतकऱ्यांना हरभरा, गहू आणि अन्य पिके घेता येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर वळावे या दृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न आहे. यंदा कापसाला विक्रमी भाव मिळाला. जवळपास 10 ते 11 हजार रुपये क्किंटल भाव होता.

कोरोना काळात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होता. त्या काळात भावही पाहिजे तसा मिळाला नाही. त्यामुळे कापसाची स्थिती बघता शेतकरी सोयाबीनकडे वळण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र 1 लाख 77 हजार 385 हेक्टर आहे. तूर 33 हजार 128 हेक्टर, ज्वारी 2 हजार 224 हेक्टर क्षेत्र तर अन्य पिकांचे क्षेत्र 9 हजार 672 इतके आहे.

जिल्ह्यातील पिके आणि क्षेत्र

  • भात 1 लाख 84 हजार 290 हेक्टर
  • सोयाबीन 65 हजार 62 हेक्टर
  • कापूस 1 लाख 77 हजार 385
  • तूर 33 हजार 128 हेक्टर
  • ज्वारी 2224 हेक्टर

हेही वाचा -Ketaki Chitale Controversy : 'केतकीला चोप देणार, तेव्हाच तिची अक्कल ठिकाण्यावर येईल'

ABOUT THE AUTHOR

...view details